सहाय्यक पोलिस निरीक्षकासह वाहनचालकावर काळाचा घाला; गाडीवर झाड कोसळल्याने दोघांचा मृत्यू

सहाय्यक पोलिस निरीक्षकासह वाहनचालकावर काळाचा घाला; गाडीवर झाड कोसळल्याने दोघांचा मृत्यू

नवीन नाशिक | प्रतिनिधी

जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील एरंडोल-कासोदाकडे जात असताना एका प्रकरणाची चौकशी करण्यासाठी गेलेल्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या गाडीवर अंजनी धरणाजवळ रस्त्यावर गुरुवारी रात्रीच्या सुमारास झाड कोसळल्याने त्यात नाशकातील अंबड गावातील रहिवासी सहाय्यक पोलीस निरीक्षकासह (Assistant Inspector of Police) चालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

सहाय्यक पोलिस निरीक्षकासह वाहनचालकावर काळाचा घाला; गाडीवर झाड कोसळल्याने दोघांचा मृत्यू
ड्रामेबाज वाहनचालकावर 'उत्पादन शुल्क विभाग' भारी; मद्यसाठा चोरीला गेल्याचा बनाव केल्याचे उघडकीस

या अपघातात आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक सुदर्शन दातीर (रा.अंबड गाव, नाशिक) व चालक अजय चौधरी हे दोन्ही जागेवरच ठार झाले. तर चंद्रकांत शिंदे, नीलेश सूर्यवंशी, भरत जेठवे हे तीन कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना एरंडोल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

सहाय्यक पोलिस निरीक्षकासह वाहनचालकावर काळाचा घाला; गाडीवर झाड कोसळल्याने दोघांचा मृत्यू
अखेर ठरलं! जुलै महिन्यात मंत्रिमंडळ विस्तार होणार... कुणाचा समावेश, कुणाला डच्चू?

या घटनेची माहिती मिळताच कासोदा पोलीस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक योगिता नारखेडे या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या. स्थानिकांच्या मदतीने जखमी पोलिसांना बाहेर काढण्यात आले. अंजनी धरणालगत ही दुर्घटना घडली आहे.

आर्थिक गुन्हे शाखेचे हे पथक पिलखोड येथील एका प्रकरणी तपासासाठी जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मयत सहाय्यक निरीक्षक सुदर्शन दातीर हे अंबड येथील रहिवासी असून त्यांच्या मृत्यूची माहिती मिळताच गावावर शोककळा पसरली. रात्री अनेक गांवकरी वाहनाने जळगावकडे रवाना झाले. दातीर यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी व एक लहान मुलगा असा परिवार आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com