सव्वाशे वर्षांपूर्वीचे वडाचे झाड कोसळले

सव्वाशे वर्षांपूर्वीचे वडाचे झाड कोसळले

सुरगाणा | प्रतिनिधी | Surgana

शहराजवळील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेजवळ रस्त्याच्या दुतर्फा असलेले वडाचे झाड अचानक उन्मळून रस्त्यावर मध्यभागी पडल्याने (The tree collapsed) वाहतूक ठप्प झाली होती. सकाळ पासूनच पावसाची रिपरिप सुरू होती...

याबाबत तहसील कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती विभागास कळविले असता तहसीलदार राजेंद्र मोरे (Rajendra More) यांनी तातडीने दखल घेतली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी तसेच पोलिस निरीक्षक दिवानसिंग वसावे (Diwansingh Vasave) यांनी पोलिसांना घटनास्थळी पाठवित जेसीबी लावून झाड हटविण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

पावसाची (Rain) रिपरिप सुरु असताना हे झाड कोसळले. त्याची मुळे उघडी पडुन मातीचा भराव वाहुन गेल्याने झाड पडले आहे. याचवेळी एखादे वाहन अथवा दुचाकीस्वार आला असता तर खुप मोठी जीवित हानी झाली असती. झाड पडल्याने उंबरठाण रस्त्यावरील वाहतूक एक ते दीड तास ठप्प झाली होती.

सुमारे शंभर ते सव्वाशे वर्षांपूर्वीचे जुने वडाचे झाड उन्मळून पडले आहे. जलपरिषद व वृक्ष प्रेमी नागरिक रस्त्यावरून येता जाता याच वडाच्या झाडाच्या फांद्या छाटून घेत असत. सार्वजनिक ठिकाणी वटवृक्षाची लागवड केल्यास शेकडो वर्षांपूर्वीच्या या झाडासारखी शेकडो रोपटी तयार झाल्यास या वटवृक्षास नवसंजीवनी मिळेल."

- रतन चौधरी

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com