वाहनाच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

वाहनाच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

नाशिक-पुणे महामार्गावरील ( Nashik-Pune Highway ) पळसे ( Palse )येथे सिन्नरकडून नाशिकरोडच्या दिशेने भरधाव वेगाने येणार्‍या एका चारचाकी वाहनाने पळसे येथे राहणारे दगडू आप्पा वाघमारे (वय 76) यांना धडक दिली.

स्विफ्ट गाडी (एमएच 05 एबी 5738) भरगाव वेगाने सिन्नरकडून नाशिकरोडच्या दिशेने येत होती. सदर गाडीची वाघमारे यांना पाठीमागून धडक बसली. यात वाघमारे हे गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेप्रकरणे नाशिकरोड पोलिसांनी ( Nashikroad Police Station )संबंधित वाहन चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वपोनि अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शिंदे हे करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com