सावित्रीबाईंचा जीवनपट उलगडणारे चित्रप्रदर्शन

सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा उपक्रम
सावित्रीबाईंचा जीवनपट उलगडणारे चित्रप्रदर्शन

निफाड । प्रतिनिधी Niphad

स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या (Pioneers of women's education), प्रथम शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांची जयंती ते राजमाता जिजाऊ (Rajmata Jijau) यांच्या जयंतीनिमित्त दि.3 ते 12 जानेवारी या कालावधीत ‘जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा’ अभियान राज्यभर साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यानिमित्त वैनतेय प्राथमिक विद्यामंदिरात शिक्षक गोरख सानप यांनी सावित्रीबाईंचे बालपण, विवाह, शिक्षण, सामाजिक कार्य, शैक्षणिक क्षेत्रांतील त्यांचे योगदान, त्यांनी स्त्री उद्धारासाठीची मूल्ये प्रदर्शन स्वरुपात मांडली. स्त्री शिक्षणाची जननी सावित्रीबाई यांच्या जीवनावरील विविध प्रसंग, कार्य, घटना आकर्षक पद्धतीने या प्रदर्शनातून मांडण्यात आल्या. तसेच लेक वाचवा-लेक शिकवा, बेटी बचाओ-बेटी पढाओ (beti bachao, beti padhao) हा संदेश देखील या प्रदर्शनातून देण्यात आला.

शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता तनपुरे (Headmistress Sujata Tanpure) यांनी सावित्रीबाई यांच्या प्रतिमेचे पूजन केले. हर्षिका कवडे, स्वरा शिंदे, आराध्या गाजरे, वेदिका वडघुले, सृष्टी कापडी, गौरी साळुंखे, स्नेहा नागरे, संयुजा आष्टेकर, ईश्वरी शिंदे, श्रेया मेतकर, ईश्वरी गाजरे, दिव्या नागरे, प्राची बैरागी, कार्तिकी जाधव, भाग्यश्री खडताळे, संस्कृती जाधव या विद्यार्थ्यीनींनी ‘मी सावित्री बोलतेय’ या विषयावर एकांकिका सादर केली.

गोरख सानप यांनी सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांच्या जीवनकार्याची माहिती दिली. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचे स्त्री शिक्षणातील (Women's education) योगदान व कार्य समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहचविणार्‍या या उपक्रमाचे न्या. रानडे विद्याप्रसारक मंडळाचे (Ranade Vidyaprasarak Mandal) कार्यकारी अध्यक्ष ल.जि. उगावकर, प्रल्हाद कराड, सचिव रतन वडघुले, संस्थापक विश्वस्त वि.दा. व्यवहारे, राजेश राठी,

राजेश सोनी, अ‍ॅड.दिलीप वाघावकर, विश्वास कराड, किरण कापसे, मधूकर राऊत, प्रभाकर कुयटे, नरेंद्र नांदे, गटशिक्षणाधिकारी केशव तुंगार, विस्तार अधिकारी कैलास बोरसे, केंद्रप्रमुख निलेश शिंदे आदिंनी कौतुक केले आहे. सूत्रसंचालन सविता रोहम यांनी केले तर किरण खैरनार यांनी आभार मानले. उपक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com