Video : वृध्द महिलेचा भाडेकरूने केला खून

तासाभरात पोलिसांनी लावला मारेकऱ्यांचा शोध
Video : वृध्द महिलेचा भाडेकरूने केला खून

नवीन नाशिक l New Nashik (प्रतिनिधी) :

भाडेकरूनेच घर मालक वयोवृद्ध महिलेचा गळा आवळून खून केल्याची घटना चुंचाळे परिसरात घडली. दरम्यान पोलिसांनी तासाभरातच मारेकऱ्यांचा शोध लावून त्यांना ताब्यात घेतले.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिजाबाई पांडुरंग तुपे (६८, रा. प्लॉट नंबर 29, गट नंबर 61, माऊली चौक, दत्तनगर चुंचाळे) ही वृद्ध महिला दिनांक 13 रोजी सायंकाळी शेजारी राहणाऱ्या एका महिलेच्या घरात ९ वाजेपर्यंत बसून घरी निघून गेल्या त्यानंतर त्या कुणाला दिसून आल्या नाही. त्यानंतर आजूबाजूच्या रहिवाशांनी सदर महिलेचा शोध घेतला.

मात्र त्या मिळून आल्या नाही त्यानंतर राहत असलेल्या ठिकाणी एका गोणी मध्ये त्यांना अज्ञात इसमाने ठार मारुन गोणीत कोंबले होते. त्या घटनेची माहिती अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी यांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत सदर गोनिमध्ये मध्ये वृद्ध महीलेचे प्रेत गळ्याला आवळून बांधल्याचे दिसून आले.

दरम्यान या खुनाबद्दल आजूबाजूला चौकशी केली असता जिजाबाई यांच्या खोलीत भाड्याने राहणारा भाडेकरू हा दिनांक 13 रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास हा त्याच्या पत्नीसह गावी गेल्याचे समजले.

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त विजय खरात, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक नखाते यांनीही घटनास्थळी धाव घेत सदर घटनेचा शोध घेण्यास मार्गदर्शन केले.

दरम्यान, अंबड पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे, किरण गायकवाड, मुकेश गांगुर्डे, हेमंत आहेर यांच्या पथकाने मान तालुका अकोले जिल्हा नगर या ठिकाणी सदर भाडेकरूचा शोध घेण्यासाठी गेले.

यावेळी निलेश हनुमंत शिंदे वय 21 व त्याची पत्नी दीपाली नीलेश शिंदे (१९) यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली. दरम्यान या दोघी पती-पत्नीने संगणमत करून मंगेश बाळू कदम (१९) रा. वील्लोळी, विष्णू अंकुश कापसे (१९) वील्लोळी, यांच्या मदतीने यांच्या अंगावरील दागिने काढून त्यांचा दोरीने गळा आवळून जीव ठार मारले.

या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वपोनी कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर, हवालदार रवींद्र पानसरे, संजय जाधव करीत आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com