ऑक्टोबरमध्ये दिवसाला सरासरी नऊ गुन्हे

ऑक्टोबरमध्ये दिवसाला सरासरी नऊ गुन्हे

नाशिक । वैभव कातकाडे Nashik

शहरात ऑक्टोबर महिन्यात october month 282 विविध स्वरूपाचे गुन्हे crime घडले आहेत. दिवसाला सरासरी नऊ गुन्हे दाखल झाले असून यात विशेष करून 4 खून, 10 विनयभंग तर 1 महिला अत्याचार असे गुन्हे आहेत. सप्टेंबर या एका महिन्यात शहरातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये एकूण 253 गुन्हे दाखल होते. त्या तुलनेत ऑक्टोबर महिन्यात 29 गुन्हे वाढले आहे. गुन्ह्यांची सातत्याने होणारी वाढ बघता नागरिकांमध्ये भीती निर्माण होत आहे.

शहरातील पोलिस ठाण्यांमध्ये दाखल गुन्ह्यांवरून दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलांच्या गळ्यातील दागिने, नागरिकांचे मोबाइल, रोकड हिसकावून नेल्याचे प्रकार सर्रास घडल्याचे आढळून आले. पोलिसांचा ठिकठिकाणी असलेल्या चौक्यांचा धाक, तसेच थंडावलेली धडक मोहीम याला कारणीभूत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.

ऑक्टोबर महिन्यात सर्वाधिक जबरी चोरी, सोनसाखळी चोरी, घरफोडी अशा चोर्‍या मोठ्या प्रमाणावर घडल्या आहेत. 282 गुन्ह्यांपैकी 125 गुन्हे हे मोटारसायकल चोरी, जबरी चोरी, सोनसाखळी चोरी, घरफोडी अशा स्वरूपाचे स्वरुपाचे आहे. या महिन्यात आनंदवल्ली येथील मंडलिक खून प्रकरणातील मुख्य आरोपी तथा शहरातील भूमाफिया रम्मी राजपूत याला हिमाचल प्रदेशात जाऊन अटक केल्याची कामगिरी वगळता कोणतीही मोठी कामगिरी दिसून आलेली नाही.

शहरात हेल्मेट सक्ती, समुपदेशन, गोदा स्वच्छतेसाठी पोलिसांची मदत तसेच वाहने टोइंग यामध्ये नियमित कारवाई दिसून येत असली तरी शहरात वाढत चाललेली गुन्हेगारी मोडून काढण्यात पोलीस प्रशासनाला यश आलेले नसल्याचे दिसून येत आहे. या महिन्यात मंदिरे, शाळा महाविद्यालये नियमित सुरु झाली असून नवरात्रोत्सवात सोनसाखळी चोरांनी आपला कार्यभाग साधून घेतल्याचे घडलेल्या गुन्ह्यांमध्ये दिसून आले आहे.

मन हेलावून टाकणारी घटना

ऑक्टोबर महिन्यात स्वतःच्या 14 महिन्याच्या मुलीवर कोणतेही वैद्यकीय ज्ञान आणि अनुभव नसताना वडिलांनी घरीच उपचार केल्याने तिचा मृत्यू झाला होता. या मन हेलावून टाकणार्‍या घटनेप्रकरणी मुलीच्या आईने फिर्याद देत वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. मृत्यूस कारणीभूत असलेल्या पित्याला पंचवटी पोलिसांनी अटक केली होती.

पोलीस चौकीजवळ खून

नशाबाजी करणार्‍या दोन मित्रांमध्ये वाद होऊन त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. त्यात एकाने सुरा खुपसून दुसर्‍याचा खून केल्याची घटना ऑक्टोबर मध्ये घडली होती. विशेष म्हणजे पोलीस चौकीच्या हाकेच्या अंतरावर ही घटना घडल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com