‘मैं भी डिजिटल’ मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहन

‘मैं भी डिजिटल’ मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहन

नाशिक । प्रतिनिधी Nashik

केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आत्मनिर्भर निधी अर्थात पीएम-स्वनिधी योजनेंतर्गत नाशिक शहरातील लाभ घेतलेल्या पथविक्रेत्यांना ‘मैं भी डिजिटल 4.0’ मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहन नाशिक महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.

पथविक्रेत्यांना खेळते भांडवल मिळावे, या दृष्टिकोनातून सुरु करण्यात आलेली केंद्र शासनाची प्रधानमंत्री आत्मनिर्भर निधी योजना सध्या राज्यात राबविली जात आहे. या योजनेचा महत्वाचा भाग म्हणजे पथविक्रेत्यांचे औपचारिक अर्थव्यवस्थेत समावेशन करणे हे आहे.

लाभार्थी पथविक्रेत्यांनी आर्थिक व्यवहार करतांना डिजिटल साधनांचा वापर केल्यावर लाभार्थी पथविक्रेत्यांना कर्जाच्या रकमेव्यतिरिक्त कॅश बॅक प्राप्त होणार आहे. याकामी पीएम-स्वनिधी योजनेचा लाभ मिळालेल्या पथविक्रेत्यांनी डिजिटल पेमेंट साधनांचा वापर करावा याबाबत शासनामार्फत निर्णय घेण्यात आलेला आहे.

एनयूएलएम विभागाशी संपर्क साधावा

नाशिक शहरात दि. 7 ते दि. 17 फेब्रुवारीदरम्यान ‘ मैं भी डिजिटल 4.0’ या नावाची मोहीम राबविणेत येत आहे. त्यानुसार पीएम-स्वनिधी अंतर्गत कर्जाचा लाभ घेतलेल्या परंतु अद्यापपावेतो डिजिटल पेमेंट साधनांचा वापर न केलेल्या पथ विक्रेत्यांनी आपल्या नजीकच्या मनपा विभागीय कार्यालयात एनयूएलएम कक्षाशी संपर्क साधून डिजिटल ऑन-बोर्डिंग प्रशिक्षण घेऊन त्वरित त्यांना मिळालेल्या कर्जाच्या रकमे व्यतिरिक्त डिजिटल ऑन-बोर्डिंगद्वारे मिळणार्‍या कॅश बॅकचा लाभ घेता येणार आहे. जास्तीत जास्त पथ विक्रेत्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे जाहीर आवाहन मनपा अतिक्रमण विभाग उपायुक्त करुणा डहाळे यांनी केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com