करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेतही मदत करण्याचे आवाहन

महापालिका आयुक्त कैलास जाधव
करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेतही मदत करण्याचे आवाहन

नाशिक । प्रतिनिधी Nashik

करोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेच्या अनुषंगाने ( In connection with the probable third wave of the corona ) नाशिक महापालिका प्रशासनाने (( Nashik Municipal Corporation administration) ) पूर्वतयारी सुरू केली आहे .

महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील विविध संस्थांच्या पदाधिकार्‍यांची बैठक ( Meeting of office bearers of various organizations in the city )घेण्यात आली. ज्या संस्थांनी पहिल्या लाटेत महापालिकेला सहकार्य केले त्यांनी पुढे सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.

शासनाने कोविड-19 नियंत्रणासाठी माझे कुटूंब माझी जबाबदारी कोविड मुक्त महाराष्ट्र मोहीम राबविली होती. हि मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली होती. या मोहिमे दरम्यान काही संस्थांनी विशेष सहकार्य महानगरपालिकेस केले होते. संभाव्य तिसर्‍या लाटे मध्येही संस्थांनी नाशिक महानगरपालिकेस सहकार्य करावे.असे आवाहन आयुक्त कैलास जाधव यांनी केले आहे

.तसेच कोविड 19 च्या काळात काही संस्थांनी उल्लेखनीय कामगिरी केली अश्या संस्थानांचा आयुक्त जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी अति. आयुक्त सुरेश खाडे,वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे,शिक्षण अधिकारी सुनीता धनगर,सहा. वैद्यकीय अधिकारी डॉ. अजिता साळुंखे उपस्थित होते.

Related Stories

No stories found.