
नाशिक | प्रतिनिधी
म्युनिसिपल कर्मचारी- कामगार सेनेच्या वतीने मनपा आयुक्तांकडे कर्मचाऱ्यांच्या समस्या मांडण्यात आल्या. याबाबत प्रशासनाने सकारात्मक भुमिका घेतलेली असली तरी या सर्व मागण्या मान्य न झाल्यास म्युनिसिपल कर्मचारी- कामगार सेनेच्या वतीने आंदोलनाची भुमिका घेवुन संपावर जाण्याचा इशारा संघटनेच्या वतीने मनपा आयुक्तांना देण्यात आला.
या मागण्यांमध्ये प्रामुख्याने शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे मनपा कर्मचाऱ्यांना दिनांक. १ जानेवारी २०१६ पासून सातवा वेतन लागू करण्यात आलेला आहे. तेव्हा पासून नाशिक महानगरपालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना फक्त एकच हप्ता देण्यात आलेला आहे.
शासन निर्णयानुसार मनपा कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोग फरकाचा दुसरा, तिसरा व चौथा हप्ता एकत्रीत देण्यात यावा, मनपा आस्थापनेवरील तांत्रिक संवर्गात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना अतांत्रिक स्वरुपाचे कामकाज देऊ नये, कनिष्ठ वेतनश्रेणी असलेल्या अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली वरीष्ठ वेतन श्रेणीतील तांत्रिक अधिकारी काम करण्यास तयार नाही. त्यामुळे वेतनश्रेणी व वेतनस्तर विचारात घेऊन वर्गवारी करावी.
कश्यपी धरण प्रकल्पग्रस्त एकूण ३६ कर्मचाऱ्यांपैकी २५ कर्मचाऱ्यांना नियमीत वेतनश्रेणी लागू करावी.सफाई कर्मचाऱ्यांना सफाईचे कामकाज करण्यासाठी सुरक्षेच्या कारणास्तव लागणारे हेल्मेट, गुमबूट , पाटी, फावडे, किटकनाशक पावडर, हातगाडे, झाडू, केरभरणी इ. साहित्य वेळेवर दिले जात नाही. त्यामुळे साफ सफाईच्या कामकाजावर विपरीत परिणाम होता. तसेच मनपा मालकीचे कर्मचारी निवासस्थानाची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. कर्मचारी हजेरी शेडवर स्वच्छता गृह व इतर सुविधा नाही.
भैय्या साहेबराव पगारे, दत्ता चौधरी या आरोग्य कर्मचार्यांचे कोवीडमध्ये निधन झालेले असतांना त्यांना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत ५० लाख रुपयांचा लाभ मिळालेला नाही. तो त्वरीत देणेत यावा.
मनपाच्या अग्निशमन विभागामध्ये प्रशिक्षणार्थी म्हणुन फायरमन व इतर पदे भरणेत येतात. शासनान एसएफटीसी मुंबई व लोकल शेल्फ गर्व्हमेंट नाशिक येथे प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थीच्या नेमणुका करण्यास मान्यता दिलेली आहे. तथापी नाशिक मनपामध्ये भुमिपुत्रांना न्याय देणेचे दुष्टीने लोकल शेल्फ गर्व्हमेंट नाशिक यांचेकडुन ९० प्रशिक्षणार्थीची नेमणुक करावी अशी युनियनच्या वतीने मागणी करण्यात आली आहे.
मनपा कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी संघटनेचे अध्यक्ष सुधाकर बडगुजर व संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने विविध मागण्या सादर केल्ंया. आदींसह विविध मागण्या मनपा आयुक्तांकडे मांडण्यात आल्या. याबाबत सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन म्युनिसिपल कर्मचारी- कामगार सेनेला देण्यात आले. तसे न झाल्यास कर्मचारी आंदोलनाचे शस्त्र उगारतील असा इशारा संघटनेद्वारे देण्यात आला.