मराठा आरक्षण
मराठा आरक्षण
नाशिक

मराठा आरक्षणाच्या मागणीसंदर्भात सोमवारी 'जागरण गोंधळ'

सीबीएस जवळ आंदोलन

Ravindra Kedia

Ravindra Kedia

सातपूर | Satpur

मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी दोन दिवस स्वतंत्र विधिमंडळाचे अधिवेशन द्यावे यासह विविध मागण्यांसाठी सोमवारी (दि. १७) सकाळी १० ला सरकारच्या नावाने जागरण गोंधळ घालण्याचा निर्णय मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला.

सीबीएस येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर हे आंदोलन करण्यात येणार आहे.
मराठा समाज संघटनांनी पुकारलेल्या ठरवण्यासाठी नाशिक जिल्ह्याचीआंदोलनाची दिशा औरंगाबादरोडवरील वरदलक्ष्मी लॉन्स येथे घेण्यात आली.

बैठकीस मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक करण गायकर यांनी लढा व समाजाच्या मागण्यांबाबत भूमिका व्यक्त करताना १५ ऑगस्ट रोजी पालकमंत्र्यांना निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्व आमदारांना निवेदन देऊन मराठा समाजाच्या मागण्यांसाठी दोन दिवस विधिमंडळात अधिवेश घेण्याची मागणी करण्यात येणार आहे.

बैठकीत गणेश कदम, शरद तुंगार, शरद शिंदे, योगेश कापसे, निलेश मोरे, नीलेश गायक, माधवी पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी राजू देसले यांनी मांडलेले मार्गदर्शन केले.यावेळी राजू देसले यांनी मांडलेले विविध ठराव एकमताने मंजूर करण्यात आले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com