अमित ठाकरेंचा विद्यार्थ्यांशी संवाद

अमित ठाकरेंचा विद्यार्थ्यांशी संवाद

मालेगाव । प्रतिनिधी | Malegaon

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित राज ठाकरे (Maharashtra Navnirman Vidyarthi Sena President Amit Raj Thackeray) यांचे मालेगाव (malegaon) शहरात आगमन होणार असून

महासंपर्क अभियानाच्या (Mass Communication Campaign) माध्यमातून ते पक्ष व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची (Maharashtra Navnirman Vidyarthi Sena) पुनर्बांधणी करणार आहेत.

मनसेची युवा वाहिनी असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी मनविसेना पुनर्बांधणीसाठी महासंपर्क अभियानांतर्गत महाराष्ट्र (maharashtra) दौरा सुरू केला आहे. अभियानाच्या पहिल्या दोन टप्यात मुंबई (mumbai) व कोकण (Konkan) विभागाचा दौरा केल्यानंतर तिसर्‍या टप्प्यात त्यांनी कालपासून उत्तर महाराष्ट्र (North Maharashtra) दौर्‍यास नाशिक जिल्ह्यातून (nashik district) प्रारंभ केला आहे.

त्यांचा नाशिक जिल्हा (nashik district) दौरा चार दिवसांचा असून उद्या ते मालेगाव दौर्‍यावर येत आहेत. यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना (students) आमंत्रित करण्यात आले असून अमित ठाकरे व्यक्तिशः विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. त्यासाठी उद्या सायंकाळी 7 वाजता संमगेश्वरातील गोविंद नामदेव दुसाने मंगल कार्यालयात होणार्‍या मेळाव्यास उपस्थित रहावे, असे आवाहन मनसे शहराध्यक्ष राकेश भामरे व मनविसे शहराध्यक्ष चेतेश आसेरी यांनी केले आहे.

दरम्यान, अमित ठाकरे यांचे शहरातील मुख्य प्रवेशद्वार असलेल्या गिरणा पुलाजवळ (Girna Bridge) भव्य स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर मोतीबाग नाका, रामसेतू, आंबेडकर पूलमार्गे रॅली काढून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराज व मोसमपूल चौकात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून कॅम्प रस्त्यावरील रॉयल हब संकुलातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन अमित ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com