अमित ठाकरे नाशिक दौर्‍यावर

अमित ठाकरे नाशिक दौर्‍यावर

नाशिक । प्रतिनिधी Nashik

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Nav Nirman Sena )संघटन मजबूत करण्यासह आगामी नाशिक महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने नियोजन करण्यासाठी पक्षाचे युवा नेते अमित ठाकरे( Amit Thackeray) दोन दिवसांच्या नाशिक दौर्‍यावर येत आहे.

मंगळवारी (दि.27) त्यांचे आगमन होणार असून बुधवारपर्यंत ते नाशिकमध्ये मुक्काम करणार आहे. यामध्ये ते गटप्रमुखांशी वन टू वन चर्चा करणार आहे. त्याचप्रमाणे पक्षाच्या मुख्यालय असलेल्या राजगड कार्यालयावर मेळावा देखील होणार असल्याचे समजते. ठाकरे यांच्या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पदाधिकारी तसेच मनसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

नाशिक महापालिकेची निवडणूक कधीही लागण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने विविध राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच भारतीय जनता पक्ष युती करून निवडणूक लढणार असल्याची जोरदार चर्चा असताना पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी यापूर्वीच महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वतंत्र निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याची घोषणा केलेली आहे. त्यामुळे नाशिकमधील सर्व 122 जागांवर पक्षाचे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरणार आहे.

दरम्यान यंदाची निवडणुकीची कमान युवा नेते अमित ठाकरे यांच्या हातात राहणार असल्याचे सांगितले जात असल्यामुळे मागील एक वर्षात अमित ठाकरे यांचे नाशिकला सतत दौरे झाले आहे. विशेष म्हणजे 122 गटप्रमुखांची नेमणूक करताना अमित ठाकरे यांनी सुमारे साडेसातशे उमेदवारांची वन-टू-वन मुलाखत घेतली होती. त्यानंतर त्यांची नेमणूक करण्यात आली होती. दरम्यान आता पुन्हा ते नाशिकच्या दोन दिवसाच्या दौर्‍यावर येत असून पक्ष संघटन मजबूत करण्याबरोबर आगामी महापालिका निवडणुकीची रणनीती देखील ठरविण्यात येणार असल्याचे समजते.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com