जुन्या नाशकात डॉ. आंबेडकर जयंतीची तयारी

जुन्या नाशकात डॉ. आंबेडकर जयंतीची तयारी

जुने नाशिक | Nashik

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती जयंतीची जय्यत तयारी जुने नाशिक परिसरात सुरू झाली आहे.

येथील मोठा राजवाडा, वडाळा नाका, कुरेशी नगर, बागवानपुरा, द्वारका आदी परिसरात जयंतीची जोरदार तयारी करण्यात आली आहे.

ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारून मोठमोठे फलक शुभेच्छा देण्यासाठी लावण्यात आले आहेत, यंदा करोनाच्या प्रादुर्भावामुळे मोठे कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती माजी नगरसेवक संजय साबळे यांनी दिली. दरम्यान समाजातील बांधवांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून येत आहे.

मागील वर्षी देखील करोनामुळे मिरवणूक काढण्यात आली नव्हती. यंदाही मिरवणूक निघणार नसल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसत असली तरी शासनाला सहकार्य करणार असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com