लेडी सिंघमकडून टवाळखोरांना लाठीचा प्रसाद

अंबड पोलीस ठाणे हद्दीत रिकामटेकडे गायब
लेडी सिंघमकडून टवाळखोरांना लाठीचा प्रसाद

नवीन नाशिक | प्रतिनिधी

सध्या नाशिक शहरात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर रात्री 8 वाजेनंतर संचारबंदी लागु करण्यात आली आहे. मात्र तरीही काही टवाळखोर चौकामध्ये बसून गोंधळ करीत असतात अशा टवाळखोरांना महिला सिंघम कडून लाठीचा प्रसाद देण्यात येत आहे. त्यामुळे या परिसरात रिकामटेकडे कमी झाले आहेत...

पोलिस आयुक्त दीपक पांडे ,उपायुक्त विजय खरात ,सहाय्यक आयुक्त शोहेल शेख यांच्या मार्गदर्शनानुसार, अंबड पोलिस ठाण्याचे वपोनी कुमार चौधरी यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील टवाळखोरांवर कारवाई करण्यात येत आहे.

यावेळी गुन्हे शाखा सपोनि गणेश शिंदे, राकेश निकम, मुरली जाधव,योगेश्वर जेजुरकर, नितीन सानप, अश्विनी भोसले, प्रशांत नागरे, नितीन गौतम,

यांच्या पथकाने अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बुरकुले हॉलच्या मागील परिसर, डीजीपीनगर क्रमांक 2 ,माऊली लॉन्स, त्रिमूर्ती चौक, पवन नगर, उदय कॉलनी, राणे नगर आदी परिसरातील टवाळखोरांना वर कारवाई केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com