माजी विद्यार्थ्यांनी शाळेला भेट दिले बेंचेस

माजी विद्यार्थ्यांनी शाळेला भेट दिले बेंचेस

ओझे | वार्ताहर Ozhe

ज्या शाळेत (School) आपण शिकलो त्या शाळेच्या व शिक्षकांच्या (Teachers) प्रति आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तब्बल २३ वर्षांनी माजी विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा तेच शिक्षक व तेच विदयार्थी बोलावून शाळा भरवली आणि शिक्षकांचा गौरव करून शाळेला ५५००० रु किमतीचे नवे २७ बेंचेस भेट (Benches gift) देऊन शाळेच्या व शिक्षकांच्या प्रति ऋण व्यक्त केले.

१ ऑक्टोबर २०२१ कादवा इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज लखमापूर (English School and Junior College Lakhmapur) या विद्यालयाची सन १९९७- ९८ इयत्ता दहावी बॅचचे माजी विद्यार्थी त्यावेळी असलेले शिक्षक एकत्र येऊन त्या दिवसांची आठवण करून दिली. शिक्षक गौरव व माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन मेळावा (Alumni get-together) आयोजित करून, पुन्हा एकदा तीच शाळा भरवून जुन्या आठवणींना उजाळा दिला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी या विद्यालयाचे माजी प्राचार्य के.के. अहिरे, प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे प्राचार्य पी.एन पाटील, माजी शिक्षक देसले डी एच, बी के कावळे विद्यालयाचे प्राचार्य बी के शेवाळे, सोनजाब विद्यालयाच्या मुख्याध्यापिका खैरनार सुशीला, उपशिक्षक ढेपले, जाधव ,सारंग घोलप व इतर शिक्षक उपस्थित होते.

उपस्थित सर्व शिक्षकांचा सत्कार माजी विद्यार्थ्यांच्या वतीने, शाल, पुस्तक (Books) व सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला तर उपस्थित माजी विद्यार्थ्याचा सत्कार शाळेच्या वतीने करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्तविक माजी विद्यार्थी प्रविण देशमुख यांनी तर विद्यार्थ्यांच्या वतीने सतीश वाळके, आशा खिरकाड़े, डॉ मंगल सोनवणे, संतोष सोनवणे, नरेंद्र पवार, जीवन वाघ, शिवाजी कड, यासार्वांनी जून्या आठवणींना उजाळा दिला.

स्नेह भोजनाची व्यवस्था विजय दळवी, सुनिल मेधने ,गणेश कड, मंगेश मेधने यांनी तर सोशल मीडिया (Social media) च्या माध्यमातून २३ वर्षानंतर ग्रुपच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत सर्व माजी विद्यार्थ्यांना सतीश वाळके, प्रविण देशमुख यांनी शाळेसाठी मदतीचे आव्हान केले व अवघ्या आठ दिवसात सर्वांच्या मदतीने सुमारे ५५ हजार रुपये निधी (Fund) उपलब्ध करून शाळेसाठी २७ नवीन बेंचेस खरेदी करून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाळेला भेट दिले.

या कामी पतींग दळवी यांनी मोलाचे सहकार्य केले. या कार्यक्रमास ५१ पैकी ,४५ माजी विद्यार्थी उपस्थित होते त्यांना एकत्र आणणे कामी मायावती बर्डे, सरला देशमुख, वैशाली देशमुख यांनी मोलाची कामगिरी केली. शाळेचे माजी प्राचार्य के के अहिरे यांनी ३१ हजार रु एका वर्गाला फरशी बसवण्यासाठी यापूर्वी दिले आहेत तर मुख्याध्यापक व्ही. पी. थोरात यांनी १० हजार रुपये ग्रुपच्या कार्यासाठी मदत फोनद्वारे जाहीर केली.

माजी विद्यार्थी डॉ गणेश मोगल यांच्या माती मेहंदी आणि बरंच काही या काव्यसंग्रहाची उपस्थितांना भेट देण्यात आली. लखमापूर हे परिसरातील मोठे गाव असून विद्यार्थी सख्या विचारात घेता विद्यालयात११/१२ वी वाणिज्य व विज्ञान (Commerce and Science) ही सुरू करावे अशी मागणी उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी केली आहे,, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ गणेश मोगल यांनी केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com