सातपूर | Satpur

सातपूर औद्योगिक वसाहती मध्ये (दि. १६) रोजी एका कंपनी मध्ये लॉक तोंडून अल्युमिनियम रॉ मटेरियल चोरी केली होती. पोलिस प्रशासनाने तातडीने तपासाची सूत्र फिरवत गुन्हेगारांना जेरबंद केले.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सातपूर पोलीस स्टेशन मध्ये दाखल तक्रारीनुसार सातपूर एमआयडीसीतील राजेंद्र इंडस्ट्रीजचे व्यवस्थापक उमेश प्रभाकर ठाकरेसं यांनी दिलेल्या तक्रारी नुसार कंपनीच्या पाठीमागील स्टोअर च्या दरवाजाचे लॉक तोडून तसेच

कंपनीच्या शेडच्या लोखंडी पत्र्याचा हुक काढून शेडमध्ये विनापरवाना कंपनीत प्रवेश करून, त्यांच्या कंपनी कडे अँपेक्स कंपनी सिन्नर यांच्याकडून जॉब वर्क साठी आलेल्या वेगवेगळ्या लांबीचे व वजनाचे ॲल्युमिनियम पाईप असे एकूण ३० हजार रुपये किमतीचे कोणीतरी अज्ञात इसमाने चोरून नेले होते. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याबाबत नाशिक शहर पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी सातपूर औद्योगिक वसाहतीमध्ये होणाऱ्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी गुन्हेगारांचा शोध घेण्याचा आदेश सातपूर वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर मोरे यांना दिला होता.

त्यानुसार सातपूर पोलीस ठाणेचे पो.ना आव्हाड, पोलीस शिपाई कासार यांनी कंपनी मधील सीसीटीव्ही फुटेज च्या पाहणी करून तसेच गुप्त माहितीद्वारे यातील आरोपी रेकॉर्डवरील असून, सदर आरोपी हा जुना पाटरोड, नवीन पाण्याची टाकी गणेश नगर गंगापुर येथे असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत नागरे व पथक यांनी सापळा रचून सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी यांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यास त्यांच्याकडून याबाबत विचारपूस केली असता त्यांनी सदर गुन्हा केला असल्याचे कबूल केले.

योगेश विजय मराळ (२६, धर्माजी कॉलनी सातपूर), अशोक बाहू जाधव( ३३, प्रबुद्ध नगर सातपूर) , रवींद्र उर्फ राउडी अशोक धोत्रे (१९, प्रबुद्ध नगर सातपुर) अशी संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून सखोल तपास केला असता त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरलेला वेगवेगळ्या वजनाचा व किमतीचा एकूण १५ हजार २०० रुपये किमतीचा अल्युमिनियम चे पाईप जप्त करण्यात आले.

तसेच सदर गुन्ह्यातील संशयितांची सखोल विचारपूस केली असता त्यांनी शहरातील इतर पोलीस ठाणे हद्दीतील कंपन्यांमध्ये चोरी केली असल्याची माहिती दिली. त्यानुसार अधिक तपास करून इतर गुन्हे उघडकिस आणले जाणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर मोरे यांनी दिली.