ग्रामीण भागात आदर भाजणीच्या कामांची लगबग

तौक्तेचा फळबागांना फटका
ग्रामीण भागात आदर भाजणीच्या कामांची लगबग

नाशिक । Nashik

एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव असतांना ग्रामीण भागात खरीपपूर्व मशागतीचे कामांची लगबग सुरु आहे.

सध्या कोरोनामुळे रोज्गारवर परिणाम झाल्याने मजुरांसह शेतकरी वर्ग घरी बसुन आहे. त्यातच पावसाळपूर्व मशागतीची कामे सुरु झाल्याने राब भाजणीच्या कामांना वेग आला आहे.

जिल्ह्यातील आदिवासी तालुक्यात भात पिकाला विशेष महत्व आहे. त्यामुळे भात लागवडीपूर्वी आदर लावण्याचे काम सुरु आहे. दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव ग्रामीण भागात जरी असला तरी कोरोना नियमांची काळजी घेत कामे सुरु आहेत.

सध्या जिल्ह्यात कडक लॉक डाऊन पाळला जात आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातही याचा परिणाम दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपसून कोरोनाच्या प्रभाव असल्याने रोजगारावर देखील परिणाम झाला आहे. परंतु यावर मात करीत शेतकरी मजूर वर्गाने गावातच रोजगाराची साधने उपलब्ध केली आहेत. अशातच पावसाळपूर्व कामांची लगबग सुरु झाल्याने शेतकरी गावात कमी शेतावर अधिक राहत असल्याचे दिसून येत आहे.

आदर भाजणी

भाताच्या लागवडीपूर्वी आदर लावण्याचे काम केले जाते. म्हणजेच शेतातील, परिसरातील पाला पाचोळा, झाडाच्या वाळलेल्या फांद्या, काटेरी झुडपे आदींना एकत्र करून एका विशिष्ट जागेवर जाळले जाते. यास आदर भाजणी किंवा लावणी म्हटले जाते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com