मुद्रांक नोंदणीसाठी 'इतक्या' बांधकाम व्यसायीकांना परवानगी

फाईल फोटो
फाईल फोटो

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

घर खरेदी करताना त्यांच्या नोदणी (Registration) प्रक्रियेतील जटीलता कमी करर्‍याच्या उद्देशाने मुद्रांक विभागाने (Department of Stamps) नोंदणी करण्याची प्रक्रिया

बांधकाम व्यवसायीकांच्या दालनात उपलब्ध करुन दिल्याने या प्रक्रियेत सूलभता येण्यास मदत होत असलयाचे निदर्शनास आले आहे. मुद्रांक नोंदणी (Registration of Stamps) करण्याच्या किचकट कामातून ग्राहकांची सूटका करण्याच्या उद्देशाने मुद्रांक विभागाने बांधकाम व्यवसायीकाच्या दारातच नोंदणी सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे.

त्यामुळे कागदपत्रांची जुळवाजुळव करणे, मुद्रांक कार्यालयातील गर्दीत होणार्‍या विलंबातून सूटका या नविन प्रणालीतून होणार असल्याची भावना नागरीकांतून उमटत आहे. ऑनलाईन (online) पध्दतीने नोंदणी करण्यासाठी 20 प्लॅटची योजना असलेल्या बांधकाम व्यवसायीकाला ‘आयजीआर’चे कनेक्शन (Connection of 'IGR') दिले जाते.

बांधकाम व्यवसायीकाने आपल्याइमारतीची नोंदणी करुन त्यातील इतर सर्व माहीती त्यात नोंदवून ठेवणे बंधन कारक आहे त्यात शेतीपासून विक्रीपर्यंतची माहीती त्यांत नोंदवून ठेवायची असते. त्यासोबत सातबारा, एनए पावती यांच्यासह सर्व माहीती त्या र्वाफ्टवेअर मध्ये टाकायची आहे. त्या माहीतीची पडताळणी करण्यासाठी सर्व मुळ कागदपत्र मुद्रांक विभाग (Department of Stamps) तपासून घेतात.

त्यानंतर तयार झालेल्या मसूद्यामध्ये काही जागा रिक्त ठेवून त्यात ग्राहकांची माहीती भरण्यासोबतच त्याचे ठसे व छायाचित्र घेऊन ती माहीती बांधकाम व्यवसायीकाच्या दालनातून थेट मुद्रांक विभागाकडे पाठवण्याची सवलत दिली जाते. या प्रणालीतून अपलोड केल्यानंतर दुसर्‍या दिवशी त्याची पडताळणी करुन मुद्रांक विभाग त्याला मंजूरी देत असते. या प्रक्रियेत सामान्य ग्राहकांना होणारा मनस्ताप कमी होऊन नोदणी प्रक्रिया सूलभ होण्यास मदत होणार आहे.

नाशिक शहरातून आतापर्यंत 20 बांधकाम व्यवसायीकांनी नोंदणी प्रणाली आपल्या कार्यालयात सूरू करुन घेतली असून,येणार्‍या काळात आणखी बांधकाम व्यवसायक याचा लाभ घेतील.

- सुनिल गावडे बांधकाम व्यवसायीक

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com