गांजाची शेती करण्यास परवानगी द्या; शेतकर्‍यांनी मांडल्या संतप्त भावना

गांजाची शेती करण्यास परवानगी द्या; शेतकर्‍यांनी मांडल्या संतप्त भावना

पालखेड मिरचीचे। वार्ताहर | Palkhed Mirchiche

अस्मानी सुलतानी संकटामुळे शेतकरी (farmers) पुर्णतः मेटाकुटीला आला आहे. नुकसान भरपाई (compensation for damages) वेळेवर दिली जात नाही. अशा परिस्थितीत

सरकारने गांजाची शेती (Cannabis farming) करण्यास परवानगी द्यावी, अशा संतप्त भावना शेतकर्‍यांनी मांडल्या. निफाड तालुक्यातील (niphad taluka) कुंभारी येथे तब्बल तीन तास उशिरा आलेल्या कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Agriculture Minister Abdul Sattar) यांच्यासमोर शेतकर्‍यांनी आपल्या व्यथा मांडल्या. कुंभारी, पंचकेश्वर शिवारात तीन दिवसांपूर्वी गारपीट झाली. त्यानंतर कृषीमंत्री अब्दुल सत्तार मंगळवारी (दि.21) शेतकर्‍यांच्या बांधावर पोहोचले.

सायंकाळी चारला येणार म्हणून शेतकरी (farmers) मोठ्या संख्येने कृषीमंत्र्यांची प्रतीक्षा करीत होते. प्रत्यक्षात मात्र मंत्रीमहोदय सातला पोहचले. अत्यंत धावत्या पद्धतीने मंत्र्यांनी नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. त्यानंतर एकाच जागेवर बसून त्यांनी शेतकर्‍यांशी संवाद साधला. यावेळी नुकसानग्रस्त शेतकर्‍यांनी आपल्या व्यथा मांडल्या. शेतकर्‍यांना भरपाई देण्यासाठी आपण शासनस्तरावर प्रयत्नशील आहे, त्यामुळे शेतकर्‍यांनी काळजी करू नये.

अस्मानी सुलतानी संकट आपल्या हातात नाही. पण, नुकसान भरपाई (compensation for damages) देण्यासाठी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्याकडे विनंती करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. परंतु, काही शेतकरी अक्षरशः संतप्त झाले होते. आपण नुकसानग्रस्तांना मदतीचे आश्वासन देता मात्र भरपाई वेळेवर मिळत नाही. त्यामुळे आम्हाला गांजाची शेती करण्याची परवानगी द्यावी,

अशी मागणी बाळासाहेब जाधव या संतप्त शेतकर्‍याने केली. त्यावेळी पन्नास खोके, एकदम ओके अशी घोषणाबाजी तरूण शेतकर्‍यांनी केली. द्राक्षांसोबत कांदा, गहू, मका व इतर भाजीपाला पिकांचे नुकसान (crop damage) झाले असताना मंत्र्यांनी केवळ द्राक्षबागेचीच पाहणी केली. आधीच मोठे नुकसान असताना मंत्रीमहोदय अंधारात दौरा करतात. याचा अर्थ मंत्र्यांना शेतकर्‍यांशी देणेघेणे नसल्याचा आरोप शेतकर्‍यांनी केला.

आता लक्ष उद्धव ठाकरे यांच्या दौर्‍याकडे

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी मंगळवारी नुकसानग्रस्त भागाचा धावता दौरा केला. त्यामुळे शेतकर्‍यांच्या मूळ प्रश्नाला बगल दिली गेली. त्यामुळे आता किमान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मालेगाव दौर्‍यावेळी त्यांनी तरी शेतकर्‍यांशी संवाद साधून समस्या जाणून घ्याव्यात, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहे.

गाड्यांचा ताफा अडवला

कृषीमंत्री अब्दुल सत्तार कुंभारी येथील शेतकरी ज्ञानेश्वर घंगाळे यांच्या घरासमोर संवाद साधून पुढील दौर्‍यासाठी निघाले. मात्र, एक हजार फुटावरच काही शेतकर्‍यांनी अब्दुल सत्तार यांचा ताफा अडवला. देखावा करण्यासाठी येऊ नका, शेतकर्‍यांची खूप काळजी असेल तर तत्काळ नुकसान भरपाई द्या, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com