कोचिंग क्लासेस संघटनेने बोलावली बैठक; ‘हे’ आहे कारण

कोचिंग क्लासेस संघटनेने बोलावली बैठक; ‘हे’ आहे कारण
न्यूज अपडेट/News Updateन्यूज अपडेट/News Update

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

दीड वर्षाच्या करोनाकाळातील (Corona) खंडानंतर आता कुठे शिक्षण (Education) क्षेत्राला गती यायला लागली होती. यातच पुन्हा एकदा राज्य शासनाने शाळा-महाविद्यालय व कोचिंग क्लासेस बंद करून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ मांडलेला दिसतो आहे....

१८ वर्षावरील विद्यार्थ्यांचे लसीचे (Vaccination) दोन्ही डोस पूर्ण झालेले आहे व १५ ते १८ चे वेगाने सुरु आहे. तरी कॉलेजेस (College) बंद केले जात आहेत. कोचिंग क्लासेसला ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटनेतर्फे (Nashik District Coaching Classes Directors Association) केली जाणार आहे.

केंद्र शासन (Central Government) जर कोचिंग क्लासेसला एम एस एम ई मध्ये समाविष्ट करून लघुउद्योगाचा दर्जा देत असेल तर कोचिंग क्लासेसची तुलना शाळा-कॉलेज बरोबर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आणि म्हणून सोशल डिस्टंसिंगचे (Social Distancing) सर्व नियम लावून राज्यातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून तात्काळ कोचिंग क्लासेसला (Coaching classes) निम्या क्षमतेने सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी.

पालक स्वच्छेने आपल्या पाल्याला कोचिंगसाठी पाठवत असेल व विद्यार्थी येत असेल तर राज्य शासनाला का आक्षेप असावा? करोना काळात राज्य शासनाने (State Government) सर्वात जास्त दुर्लक्ष केलेले क्षेत्र जर कोणते असेल तर ते शिक्षण क्षेत्र आहे.

कोचिंग क्लासेस संचालक ग्राउंड लेव्हलला काम करीत असल्यामुळे दोन वर्षाच्या खंडानंतर जेव्हा विद्यार्थी कोचिंग क्लासला येतो, तेव्हा त्याची किती वाईट परिस्थिती शिक्षणामध्ये आहे याची कल्पना आम्हाला आहे. याचे भान राज्यातील कारभाऱ्यांना नाही याची खंत वाटते, असे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

कोचिंग क्लासेसमध्ये शाळेच्या तुलनेने विद्यार्थ्यांची संख्या कमी असते, स्कूलबसचीही गरज नसते, पालक स्वतः विद्यार्थांना आणून सोडतात आणि घेऊन जातात शाळा-कॉलेजेस पेक्षा कोचिंग क्लासेसमध्ये सोशल डिस्टंसिंगचे सर्व नियम काटेकोरपणे पाळले जातात. हा गेल्या दीड वर्षातील अनुभव आहे आणि पालकांना सुद्धा याची कल्पना आहे आणि म्हणूनच आजही पालक शाळा-कॉलेजेसपेक्षा कोचिंग क्लासेसमध्ये आपल्या पाल्याला पाठवायला तयार आहे.

गेल्या दीड वर्षांमध्ये तसा विश्वास कोचिंग क्लासेस संचालकांनी मिळवलेला आहे आणि म्हणून शासनाने तात्काळ कोचिंग क्लासेस सुरू ठेवण्याबाबतचा नवीन आदेश काढावा अशी विनंती निवेदनाद्वारे मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना केली जाणार आहे. याबाबत योग्य निर्णय घेण्यासाठी सोमवारी (दि. १०) नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटनेच्या शिंगाडा तलाव येथील कार्यालयात सकाळी ११ वाजता, जिल्ह्यातील सर्व क्लासेस संचालकांची बैठक बोलावण्यात आली आहे, अशी माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष जयंत मुळे यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com