सभासदांच्या वारसांना निधी वाटप

सभासदांच्या वारसांना निधी वाटप

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

तिरूपती बालाजी (tirupati balaji) दर्शनासाठी जात असतांना ट्रकने धडक दिल्याने (accident) मृत्यूमुखी पडलेल्या दरेगाव व सायने येथील मामको बँकेच्या (Mamko Bank) मृत सभासदांच्या कुटूंबियांना मामको बँकेतर्फे सभासद (member) अपघात विमा योजनेंतर्गत (insurance plan) प्रत्येकी दोन लाखांचा धनादेश देण्यात आला.

मामको बँक सभागृहात चेअरमन अ‍ॅड. भरत पोफळे, व्हा. चेअरमन संजय दुसाने यांच्या हस्ते दरेगाव येथील मृत सभासद सतिष दादाजी सूर्यवंशी यांच्या वारसदार पत्नी ज्योती सूर्यवंशी तसेच सायने येथील मृत सभासद विलास महादू बच्छाव यांच्या वारसदार पत्नी चित्रा बच्छाव यांना प्रत्येक दोन लाखाचा धनादेश सपुर्द करण्यात आला.

मामको बँकेने अपघाती घटनांपासून सभासदांच्या कुटूंबावर येणार्‍या अडचणीत काही प्रमाणात कां होईना मदत व्हावी यासाठी सर्व सभासदांचा विमा उतरविला आहे. कुटूंबातील कर्त्या पुरूषांच्या निधनामुळे सूर्यवंशी व बच्छाव कुटूंबियांवर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. या कुटूंबियांना आलेल्या संकटातून सावरण्यासाठी काही प्रमाणात मदत व्हावी या दृष्टीकोनातून अपघाताच्या घटनेनंतर बँकेतर्फे विमा कंपनीकडे तातडीने दावा केला गेला.

सदर कंपनीने देखील त्वरीत दोन्ही दावे मंजूर केल्याने सदर धनादेशांचे वाटप वारसदारांना करण्यात आले असल्याची माहिती ज्येष्ठ संचालक राजेंद्र भोसले यांनी यावेळी बोलतांना दिली. यावेळी ज्येष्ठ संचालक शरद दुसाने, सतिष कलंत्री, दादाजी वाघ, गौतम शाह, भिका कोतकर, छगन बागुल, सुरेश सायगावकर, भास्कर पाटील, जनरल मॅनेजर कैलास जगताप, विमा कंपनीचे शाखाधिकारी प्रदिप कासार, लक्ष्मण पाटील यांच्यासह मृत सभासदांचे नातेवाईक उपस्थित होते.

Related Stories

No stories found.