समाजकल्याणच्या वसतिगृहांसाठी कोटींचा निधी वाटप

समाजकल्याणच्या वसतिगृहांसाठी कोटींचा निधी वाटप

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

समाजकल्याण विभागाच्या (Department of Social Welfare) राज्यभरातील ४११ वसतिगृहांना (Hostels) शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता १२१ कोटी रुपयांच्या निधीचे वाटप (Allocation of funds) करण्यात आले आहे.

या निधीतून विद्यार्थ्यांना (students) शैक्षणिक सुविधा (Educational facilities) पुरविल्या जाणार असून त्यांना सोयी-सुविधा मिळणार आहेत. समाजकल्याण विभागातर्फे नाशिक जिल्ह्यातील (nashik district) वसतिगृहांतील विद्यार्थ्यांना (students) याचा फायदा होणार आहे.

अनुसूचित जातीतील (Scheduled Caste) विद्यार्थी अनुसूचित जमातीतील विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थी दुर्बल, दुर्लक्षित घटकांतून आलेल्या विद्यार्थ्यांना केवळ आर्थिक परिस्थितीअभावी मोठ्या शहरांमध्ये शिक्षणापासून (education) वंचित राहावे लागू नये, यासाठी विविध योजना उपलब्ध आहे. अशा विद्यार्थ्यांच्या सुविधेकरिता समाज कल्याण विभागातर्फे (Department of Social Welfare) राज्यस्तरावर शासकीय वसतिगृह कार्यान्वित आहेत.

विभागाच्या वसतिगृहांत (Hostels) प्रवेशासाठी रितसर प्रक्रिया राबविली जात असते. हा निधी (fund) समाजकल्याण आयुक्तालयाने राज्यातील प्रादेशिक उपायुक्त कार्यालयास (Offices of Regional Deputy Commissioners) वितरित केला असून, या कार्यालयामार्फत जिल्हा कार्यालयांना या निधीचे वाटप करण्यात येत आहे. याद्वारे वसतिगृहांसाठीचे विविध खर्च भागविले जाणार आहेत. यात इमारत भाडे, आहारावरील खर्च, कार्यालयीन खर्च, कर्मचाऱ्यांचे वेतन आदी सुविधांसह सामग्री पुरवठ्याचा समावेश असणार आहे.

अनुसूचित जाती मधील विद्यार्थी - ४७ कोटी ४४ लाख ६६ हजार

अनुसूचित जमाती मधील विद्यार्थी - ५३ कोटी ४० लाख

आर्थिक दृष्ट्या मागास विद्यार्थी - २० कोटी २१ लाख

एकूण मंजूर निधी - १२१ कोटी ५ लाख ६६ हजार

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com