अलायन्स एअरचे सोमवारपासून दिल्ली-अहमदाबाद 'टेकऑफ'

सोबत पुणे बेळगाम सेवेला प्रारंभ, तर मंगळवारपासून ट्रूजेटची अहमदाबाद सेवा
अलायन्स एअरचे सोमवारपासून दिल्ली-अहमदाबाद 'टेकऑफ'

सातपूर | Satpur

एअर इंडियाची (Air India) उपकंपनी अलायन्स एअर (Aliance Air) सोमवार पासून (१२ जुलै) दिल्ली-अहमदाबाद-नाशिक (Delhi Ahmadabad Nashik) ही विमानसेवा (Air service) सुरू करीत आहे. याशिवाय यापूर्वीच्या नाशिक-पुणे सेवेचा (Nashik Pune) विस्तार करुन आता नाशिक पुणे सोबत बेळगामचाही (Nashik - Belgam) समावेश राहणार आहे.

सोमवारपासून सुरु होणारी हि सेवा शनिवार रविवार वगळता शुक्रवारपर्यंत दररोज उपलब्ध राहणार आहे. अलायन्स एअरकडून या सेवेकरिता वेबसाइटवरून प्रत्यक्ष तिकीट बुकिंगला (Ticket Booking) करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, या नव्या सेवेमुळे आता बेळगाव आणि अहमदाबाद साठी विद्यमान कंपन्यांसोबतच दूसरी विमान कंपनी सेवा देणार आहे.त्यामुळे पर्यटकांना (Tourist Responce) लाभ मिळणार आहे.

करोनाच्या दूसऱ्या लॉकडाऊनपूर्वी (Corona Second Lockdown) नाशिक विमानतळावरून अलायन्स एअर, टू जेट (Tru Jet), स्पाइस जेट (spice Jet) आणि स्टार एअर याकंपन्यांकडून अहमदाबाद, हैदराबाद, बंगळुरू, दिल्ली, पुणे, बेळगाव, कांडला या शहरांची विमानसेवा सूरु होत्या. दूसऱ्या लाटेतील लॉकडाऊनमुळे स्थगित होतो.

अनलॉक जाहीर (Nashik Unlock) होताच स्टार एअरने यात आघाडी घेत ०२ जुलैपासून नाशिक-बेळगाव ही सेवा पुन्हा सुरू केली. यानंतर १२ जूलैपासून अलायन्स एअरने आपल्या सेवा विस्तारासह सुरू करण्याची घोषणा केली आहे.

ट्रूजेटची विमान कंपनीच्या वतीने मंगळवारपासून अहमदाबाद नाशिक विमानसेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. बुधवार व शनिवार वगळता आठवड्याचा इतर सर्व वारांना सायंकाळी 6.20 व 7.20 यावेळेत अहमदाबाद येथुन स्वतंत्र विमाने उड्डाण भरणार आहेत.

हैदराबादबाबत स्पष्टता नाही

अलायन्स एअरकडूनच हैदराबाद-नाशिक अहमदाबाद या मार्गावर पूर्वी सेवा सुरू होती. हैदराबादकरिता सेवा सुरू ठेवण्यात येईल की नाही, याबाबत लवकरच अधिकृत सूचना मिळेल.

- मनीष रावल, चेअरमन, आयमा एव्हिएशन कमिटी

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com