अलायन्स एअरलाईन्सची नाशिककरांसाठी विमानसेवा
नाशिक

अलायन्स एअरलाईन्सची नाशिककरांसाठी विमानसेवा

तीन शहरांसाठी सुविधा

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी Nashik

अलायन्स एअरलाईन्सद्वारे देशातील विविध शहरांना जोडणार्‍या विमानसेवेला आजपासून प्रभावीपणे सुरू करण्यात येत असल्याने पुन्हा एकदा नाशिककरांना विमानसेवेद्वारे ‘उडान’ घेता येणार आहे.

अलायन्स एअरलाईन्सने नाशिकला तीन शहरांना जोडणारी सेवा सुरू केली आहे. हैदराबाद-नाशिक-पुणे, हैदराबाद-नाशिक-अहमदाबाद व अहमदाबाद- नाशिक-पुणे या सेवा सुरू करण्यात आल्या आहेत.

'उडान' उपक्रमांतर्गत किमान दर २५०० रुपये असल्याने या सेवांना चांगला प्रतिसाद मिळेल असा विश्वास अलायन्स एअरलाईन्सच्या पदाधिकार्‍यांना आहे.

हैदराबाद-नाशिक-अहमदाबाद

फ्लाईट ९I ८७१ हैदराबादहून ७.५५ वा. सुटून ९.४५ वाजता नाशिक येथे पोहोचेल. १०.१५ वाजता नाशिकहून निघून अहमदाबाद येथे ११.३० वाजता पोहोचेल. रविवारी फ्लाईट ९I ८७१ हैदराबादहून १२.२५ वाजता सुटेल आणि नाशिकमध्ये १४.१५ वाजता पोहोचेल. नाशिक येथून १४. ४५ वाजता सुटून ते अहमदाबादला १६.०० वाजता पोहोचेल.

पुणे-नाशिक-हैदराबाद

आठवड्यातील सर्व दिवस, फ्लाईट ९I ८८८ पुण्याहून २०.०० वा. सुटेल आणि २१.०० वा. नाशिकला पोहोचेल. त्यानंतर नाशिक येथून २१.२५ वा. सुटेल आणि २३.१० वा. हैदराबादला पोहोचेल.

अहमदाबाद-नाशिक- पुणे

फ्लाईट ९I ८८७ अहमदाबादहून १६.०० वा सुटेल आणि नाशिक येथे १७.१५ वाजता पोहोचेल. त्यानंतर नाशिक येथून १८.०० वाजता सुटेल आणि पुण्यात १९.१५ वाजता पोहोचेल. रविवारी फ्लाईट ९I ८८७ अहमदाबादहून १६.३० वाजता सुटेल आणि नाशिकमध्ये १७.४५ वाजता पोहोचेल. नाशिक येथून १८.३० वाजता निघून पुणे येथे १९.४५ वाजता पोहोचेल.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com