मुंबईसाठी अलायन्स एअरची नाशिकहून उड्डाण
नाशिक

मुंबईसाठी अलायन्स एअरची नाशिकहून उड्डाण

Abhay Puntambekar

सातपूर । प्रतिनिधी Satpur

एअर इंडियाच्या अलायन्स एअर या उपकंपनीद्वारे बुधवारी (दि.२२) मुंबई-नाशिक-मुंबई अशा विशेष उड्डाणाचे नियोजन करण्यात आले आहे. बुधवारी मुंबई विमानतळावरुन सायंकाळी ४.३० वाजता हे विमान उड्डान घेणार असून, नाशिक विमानतळावर ५.१५ वाजता पोहोचणार आहे.

नाशिकहून पुन्हा सायंकाळी ६.१५ वाजता मुंबईसाठी उड्डाण घेणार असुन ७ वाजता मुंबई विमानतळावर पोहोचणार आहे. या मार्गाला प्रवाशांचा किती प्रतिसाद मिळतो हे तपासण्यासाठीची ही ‘टेस्ट फ्लाइट’ घेतली जाणार आहे.

या सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला तर भविष्यात नाशिकहून मुंबईसाठी नियमित विमानसेवा सुरू केली जाणार असल्याची माहिती अलायन्स एअर या सूत्रांनी दिली.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com