शाळा इमारत बांधकामात भ्रष्टाचाराचा आरोप

बोकटे ग्रामस्थांची जि.प.सीईओ यांच्याकडे चौकशीची मागणी
शाळा इमारत बांधकामात भ्रष्टाचाराचा आरोप

नाशिक | प्रतिनिधी Nashik

येवला तालुक्यातील ( Yeola Taluka ) बोकटे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची (Bokte Zilla Parishad Primary School)नुतन इमारत व तत्सम बांधकामात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. याची चौकशी करावी,अशी मागणी  जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे ग्रामस्थांनी केली आहे.चौकशी न झाल्यास उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.

  निवेदनात म्हटले आहे,येवला तालुक्यातील बोकटे येथील  जिल्हा परिषद शाळेत जिल्हा परिषद,नाशिक,प्रयास फाउंडेशन मुंबई आणि इतर दानशुर लोकांकडुन आलेल्या देणगी स्वरुपातील रकमेतुन झालेले बांधकाम, सुशोभिकरण व इतर तत्सम कामे हे अंदाजपत्रका नुसार झालेले नाही.यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे निवेदनात म्हटले आहे.

तसेच एकाच कामासाठी प्रयास फाउंडेशन,मुंबई व जिल्हा परिषद,नाशिक कडुन मिळालेल्या निधीचा वापर करण्यात आला आहे. परंतु,कामांचे बीले दाखवितांना मात्र वेगवेगळे दाखविले गेले आहे .तर,काही कामांसाठी दाखविलेला खर्च हा मिळालेल्या निधीच्या मुल्यांकनानुसार नसुन त्यात मोठी तफावत आढळून आली आहे.

प्रयास फाउंडेशन,मुंबई यांच्याकडुन मिळालेला निधी हा शालेय व्यवस्थापन समितीच्या बॅंक खात्यात वर्ग न करता इतर दुसऱ्या खाजगी व्यक्तीच्या बॅंक खात्यात वर्ग करुन तेथुन तो निधी परस्पर वळविला गेला असल्याचे  तक्रारदार यांनी म्हटले आहे.या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक तफावत आढळुन येत असुन,त्यात मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचे नेवेदनात म्हटले आहे.

या शालेय इमारत बांधकामाच्या ठिकाणी झालेल्या सर्व कामांची व त्यासाठी केलेल्या खर्चांची सखोल चौकशी करून आर्थिक गैरव्यवहार करणाऱ्या संबंधित दोषींवर त्वरीत योग्य कार्यवाही करावी.तसेच यापुढे जिल्हा परिषद,नाशिक व प्रयास फाउंडेशन,मुंबई यांच्याकडुन मिळणारा सर्व निधी हा शालेय व्यवस्थापन समितीच्या बॅंक खात्यात वर्ग करुन त्याअंतर्गतच अंदाजपत्रकानुसार खर्च करण्यात यावा.अन्यथा कार्यवाही न झाल्यास येवला पंचायत समिती समोर,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष हे बोकटे ग्रामस्थांसह आमरण उपोषण करतील,असे निवेदनात म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com