कातरणी येथील ग्रामसेवकावर भ्रष्टाचाराचा आरोप

कातरणी येथील ग्रामसेवकावर भ्रष्टाचाराचा आरोप

ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामसेवकाला कार्यालयात कोंडले

येवला | प्रतिनिधी Yeola

दिनांक 25 सप्टेंबर शनिवार रोजी येवला तालुक्यातील (Yeola Taluka) बहुचर्चित असलेली कातरणी ग्रामपंचायत (Katarni Gram Panchayat) येथील नवनिर्वाचित सदस्यांनी व सरपंचांनी ग्रामसेवक संजय व्यवहारे (Gramsevak Sanjay Vyavahare) यांच्यावर भ्रष्टाचार (Corruption), कामात अनियमितता (Irregularities in work), तसेच ग्रामपंचायत निवडणुका (Gram Panchayat elections) होऊन साडे पाच महिन्यात एकही विकास काम (Development work) सुरू न केल्याचा ठपका या या ग्रामसेवकाला ठेवण्यात आला

तसेच मासिक मीटिंग संपल्यानंतर सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामसेवक व्यवहारे यांना त्यांच्या कार्यालयात कोंडून घेतले तसेच ग्रामपंचायत दप्तराचे काम घरी घेऊन न जाता कार्यालयातच पूर्ण करावे अशी मागणी देखील करण्यात आली कतरणी गावचे उपसरपंच योगेश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार घरपट्टी (Homestead), पाणीपट्टी (Water strip) तसेच बाजार लिलाव याचा हिशोब यामध्ये एका महिन्यात 15 हजार रुपयांची तफावत आढळून आली यामुळे सर्व सदस्यांनी मिळून ग्रामसेवक व्यवहार यांना कार्यालयात कुलूप लावून कोंडून ठेवले होते.

नांदगाव तालुक्यातील (Nandgaon Taluka) नागपूर (Nagpur) येथून भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे (allegations of corruption) ग्रामसेवक संजय व्यवहारे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती यानंतर येवला तालुक्यातील पारेगाव येथे मास्क आणि आणि सनीटायझर घोटाळ्याचा (Masks and and sanitizer scams) आरोप देखील व्यवहार यांच्यावर झाला होता या कारणाने देखील त्यांची बदली करण्यात आली होती. दरम्यान गटविकास अधिकारी डॉ उमेश देशमुख (Group Development Officer Dr. Umesh Deshmukh) यांनी आता या प्रकरणी लक्ष घालून त्वरित ग्रामसेवक बदलून देण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com