बिजनेस बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनलचे सर्व उमेदवार विजयी

बिजनेस बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनलचे सर्व उमेदवार विजयी

नाशिक रोड | प्रतिनिधी

येथील बिझनेस बँकेच्या निवडणुकी ची आज सकाळी मतमोजणी होऊन या मतमोजणीत सहकार पॅनलचे सर्व 14 उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी झाले.या निवडणुकीत सहकार पॅनलचे पाच उमेदवार अगोदरच बिनविरोध निवडून आले होते

रविवारी जेल रोड येथील कोठारी कन्या शाळेत मतदान झाले होते या निवडणुकीत सर्वसाधारण गटातून 14 जागेसाठी 15 उमेदवार रिंगणात होते रविवारी सुमारे सत्तावीस टक्के मतदान झाले होते त्यानंतर आज सकाळी येथील कुलथे मंगल कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी फय्याज मुलानी यांच्या उपस्थितीत मतमोजणीला प्रारंभ झाला.

सुरुवातीपासूनच सहकार पॅनलचे सर्व उमेदवार आघाडीवर होते या निवडणुकीत विजयी झालेले उमेदवार पुढील प्रमाणे अशोक तापडिया ( 1400 ) विजय संकलेचा ( 1386 ) श्रीनिवास लोया ( 1396 ) वसंतराव नगरकर (1371 ) विजय चोरडिया( 1412 ) गोपी आल ठक्कर ( 1354 ) नेमीचंद कोचर (1391 ) बसंत गुरुनानी ( 1341 ) सचिन घोडके ( 1361 ) सुरेश टरले (1329 ) डॉक्टर पुनमचंद ठोळे ( 1384 ) उमेश नगरकर ( 1380 ) गोरखनाथ बलकवडे ( 1297 ) मोहन लाहोटी (1390 ) तर अपक्ष उमेदवार जीवन घिया यांना फक्त ( 441 ) मते मिळाली.

त्यामध्ये इतर मागासवर्ग गटातून पुरुषोत्तम फुलसुंदर महिला गटातून आशा जाजू राजश्री कपोते भटक्या विमुक्त जाती जमाती गटातून अंजली राठोड व अनुसूचित जाती जमाती या गटातून दयानंद सदाफुले हे पाच उमेदवार बिनविरोध निवडून आले. निवडणुकीचे निकाल घोषित होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com