तालुक्याचा सर्वांगीण विकास साधणार : खोसकर

तालुक्याचा सर्वांगीण विकास साधणार : खोसकर

हरसूल । वार्ताहर Harsul

‘जनतेने विकासाच्या रूपाने विधानसभा निवडणुकीत (Assembly elections) कौल दिला आहे. माझ्यावर विश्वास दाखवून विकासाला जनतेने मत दिले आहे, त्या विश्वासाला पात्र राहून त्र्यंबकेश्वर तालुक्याचा (Trimbakeshwar taluka) सर्वांगीण विकास विकासकामांच्या (development work) माध्यमातून साधत असल्याचे प्रतिपादन आमदार हिरामण खोसकर (MLA Hiraman Khoskar) यांनी केले.

भूतमोखाडा येथे सभामंडप लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून लहान मोठे विकासकामे मंजूर करून विकासावर भर देत आहे. त्यात पाणी (water), वीज (elecricity), रस्ते (road), आरोग्य (health) तसेच मूलभूत समस्या आदी सोडविण्यावर अग्रक्रम आहे. जनतेने माझ्यावर ठेवलेल्या विश्वासाला कदापीही तडा जाऊ न देता त्र्यंबकेश्वर तालुक्याचा सर्वांगीण विकास साधण्यावर भर दिला जात आहे.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील (Trimbakeshwar taluka) अतिदुर्गम भागातील मूलवड गणात विविध विकासकामांचे भूमिपूजन (bhumipujan) तसेच लोकार्पण आमदार हिरामण खोसकर यांच्या हस्ते करण्यात आले. खरशेत (सेंद्रिपाडा) कळमुस्ते, भूतमोखाडा, कोंटबी, बेरवळ, मुलवड, मुरंबी, रानघर शिरसगाव, नांदुरकीपाडा, हनुमंतपाडा आदी गावांचा समावेश आहे.

यावेळी भारती भोये, सरपंच भारती खिरारी, प्रभाकर खिरारी, मधुकर पखाने, वामन खरपडे, गंगाराम लहारे, अमृत चौधरी, एकनाथ घाटाळ, गोपाळ महाले, नवसु खिरारी, पोलीस पाटील राजेंद्र भोये, बळीराम वांगाड, अर्जुन मौळे, मोहन खिरारी, शंकर महाले, शांताराम बरफ,लक्ष्मण मौळे, पिंटू कामडी, यादव खिरारी, ईश्वर मते, अरुण महाले, यादव महाले, विष्णू खिरारी, दिनकर साबळे, वामन महाले, ग्रामसेवक एन. आर. लहारे, रामदास महाले, हिरामण राऊत, हरिष गायकवाड, मनोहर शिरोळे,विष्णू गांगोडे, भास्कर खोसकर,दत्तू लिलके,दिनकर लिलके आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com