
निफाड । प्रतिनिधी | Niphad
पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रत्यक्ष अनुभवावर आधारित शिक्षण (education) व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास (development of students) हेच होरायझन अकॅडमीचे (Horizon Academy) वैशिष्ट्ये होय असे प्रतिपादन मविप्र सरचिटणीस नीलिमा पवार (MVP General Secretary Neelima Pawar) यांनी केले आहे.
येथील मविप्र च्या होरायझन अकॅडमीचे उद्घाटन भाजप नेते सुरेशबाबा पाटील (BJP leader Suresh Baba Patil) यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मविप्र अध्यक्ष डॉ.तुषार शेवाळे, सभापती माणिकराव बोरस्ते, उपसभापती राघो अहिरे, अशोक पवार, उत्तम भालेराव, दत्तात्रय पाटील, नामदेव महाले, दिलीप पाटील, डॉ.प्रशांत देवरे, डॉ.जयंत पवार, हेमंत वाजे, विश्राम निकम, सचिन पिंगळे, डॉ.सुनील ढिकले, रतन वडघुले, शंकर कोल्हे, रमेश कापसे, राजेंद्र डोखळे, श्रीमती. रूपाली रंधवे, अनिल कुंदे, माधव गीते, मोतीराम मोगल, भास्कर पानगव्हाणे, रमेश जाधव, प्रभाकर वाघ, आशिष मोगल, सुरेश कापसे, नारायण पाटील, छोटु पानगव्हाणे,
शालेय समितीचे अध्यक्ष राजेश मोगल आदी उपस्थित होते. प्रास्ताविकात मुख्याध्यापिका स्नेहल सोनवणे यांनी महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाच्या विचारसरणीने प्रेरित होऊन कर्मवीरांनी संस्थेची स्थापना केली व उत्तर महाराष्ट्रात (North Maharashtra) अग्रगण्य संस्था कशी झाली ते सांगताना विद्यार्थ्यांना (students) मूल्य शिक्षणावर आधारित शिक्षण (education), करोना (corona) काळातील शैक्षणिक व्यवस्थापन (Educational Management) कसे केले. तसेच विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम कशाप्रकारे राबविले याची माहिती दिली. तालुका संचालक प्रल्हाद गडाख यांनी शालेय इमारत, पायाभरणी व शाळेचा विकास विस्तार याविषयी माहिती दिली.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी (students) सादर केलेली गणेश वंदना, स्वागत गीत व विद्यार्थ्यांचा कलाविष्कार पाहुन पाहुणे सुखावले. सभापती माणिकराव बोरस्ते (Chairman Manikrao Boraste) म्हणाले की, कर्मवीरांच्या प्रेरणेने संस्थेचा प्रवास अतिशय पारदर्शीपणे व दिवसेंदिवस विकासाच्या दिशेने सुरू असून ग्रामीण भागात इंग्रजी शिक्षणाची गरज ओळखून संस्थेने होरायझन अकॅडमी (Horizon Academy) सुरू केली असे सांगितले.
तर डॉ.तुषार शेवाळे यांनी होरायझन हे संस्थेचे ड्रीम प्रोजेक्ट असून ग्रामीण भागातील विद्यार्थीही इंग्रजी शिक्षित झाला पाहिजे यासाठी संस्थेचा प्रयत्न असून शिस्त, गुणवत्ता व पारदर्शकता या त्रिसूत्रीवर आधारित संस्थेचे कामकाज चालू आहे. होरायझन हा संस्थेचा ब्रॅण्ड बनलेला आहे असे मत त्यांनी मांडले. याप्रसंगी सभासद, पालक उपस्थित होते. चिटणीस सुनील ढिकले यांनी आभार मानले तर उपशिक्षिका सुप्रिया सुरवाडे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमासाठी शिक्षक, कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.