शांतता नांदावी यासाठी सर्वपक्षीय शांतता फेरी

शांतता नांदावी यासाठी सर्वपक्षीय शांतता फेरी

निफाड। प्रतिनिधी

राज्यात सुरू असलेल्या भोंगा ह्या कारणावरून वातावरण दूषित करण्याचा काही लोक प्रयत्न करीत असल्याने निफाड शहरातील (niphad city) नागरिकांमध्ये अतिशय सलोख्याचे संबंध असून आतापर्यंत हिंदु-मुस्लिम (Hindu-Muslim) असा कोणताही वाद झालेला नाही. त्यामुळे शहराची ही शांतता अशीच अबाधित रहावी यासाठी शांतता समिती बैठक संपन्न झाली. त्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांच्या (All party leaders) वतीने शहरातून शांतता फेरी (Peace round) काढण्यात आली.

रमजान ईद (ramdan eid) व अक्षय तृतीया (Akshay Tritiya) हे सण शांततेत साजरे व्हावे. तसेच सर्व समाजाचे नागरिक गुण्या गोविंदाने एकत्र राहत असून शहरात अद्यापपर्यंत हिंदु-मुस्लिम अथवा इतर जातीय दंगली (Ethnic riots) झाल्या नाहीत. मात्र आता काही लोक भोंगा या कारणावरून समाजा-समाजात भांडणे लावून वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. आज राज्यात, देशात अनेक ज्वलंत प्रश्न आहेत.

महागाई, बेरोजगारी, विजेचा प्रश्न, पेट्रोल, डिझेल, गॅसचे वाढलेले दर, जिवनावश्यक वस्तूंच्या वाढलेल्या किंमती, शेतीमालाचे पडलेले भाव असे अनेक प्रश्न असतांना ते सोडविण्याऐवजी समाजा-समाजात वाद निर्माण करण्याचे काम केले जात आहे. मात्र निफाडची (niphad) जनता सुज्ञ असल्याने यापुढेही शहरात शांतता रहावी यासाठी शांतता समितीची बैठक संपन्न झाली. यावेळी निफाडचे माजी नगराध्यक्ष राजाराम शेलार, शिवसेनेचे नेते अनिल कुंदे, काँग्रेसचे ता.अध्यक्ष मधूकर शेलार, राष्ट्रवादीचे नेते शिवाजी ढेपले, सागर कुंदे, तन्वीर राजे, नूर शेख, नईम पठाण यांनीही मनोगत व्यक्त केले.

यानंतर शहरातून शांतता फेरी काढण्यात आली. या फेरीत नगराध्यक्षा रुपाली रंधवे, नगरसेवक जावेद शेख, दिलीप कापसे, देवदत्त कापसे, संजय कुंदे यांचेसह रमेश जाधव, युवा नेते विक्रम रंधवे, रघुनाथ कुंदे, वकिल शेख, बाळासाहेब पेंढारकर, अकिला बानो, सचिन जाधव, सुनील निकाळे, महेश जंगम, सागर निकाळे, विकास खडताळे, भाऊसाहेब कापसे, संपत व्यवहारे, सदाशिव धारराव, किसन कुंदे, दीपक गाजरे, रतन गाजरे आदींसह शहरातील नागरिक उपस्थित होते.

Related Stories

No stories found.