युवती मृत्युप्रकरणी सर्वपक्षीय मोर्चा

सिन्नर बसस्थानकाजवळ रास्ता रोको आंदोलन
युवती मृत्युप्रकरणी सर्वपक्षीय मोर्चा

सिन्नर । वार्ताहर Sinnar

येथील संजीवनी नगर (Sanjeevani Nagar) भागात राहणार्‍या किरण राजेंद्र सानप (25) या युवतीने गळफास लावून आत्महत्या (Suicide) केल्यानंतर या आत्महत्येबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी सर्वपक्षीय कार्यकत्यार्ंंनी (All-party activists) लव्ह जिहादचा (Love Jihad) संशय व्यक्त करीत शहरातुन मोर्चा काढत घटनेचा निषेध व्यक्त केला. संशयीत आरोपीवर बलात्काराचा (Rape) गुन्हा दाखल करुन फाशीची शिक्षा ठोठावण्याची मागणी करण्यात आली.

पोलिसांनी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न चालवल्याचा आरोप करत सर्वपक्षीय कार्यकर्ते (All-party activists) संतप्त झाले. संबंधित युवती चार महिन्यांची गर्भवती होती. त्यामूळे या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करुन संशयितावर खूनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली. शहरातील वावी वेस परिसरातून मोर्चाला सुरुवात करण्यात आली.

यानंतर वावी वेस, शिवाजी चौक, गणेश पेठ, नेहरु चौक, गावठामार्गे मोर्चा बस स्थानक (Bus station) परिसरात आला. मोर्चात राष्ट्रवादी (Nationalist Congress)), शिवसेना (shiv sena), भाजप (bjp), आरपीआय (RPI), मनसे (MNS), प्रहार या पक्षांसह वंजारी समाज फाउंडेशनचे (Vanjari Samaj Foundation) पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह मृत किरणच्या शेकडो नातेवाईकांनी भाग घेतला. सुमारे 1 तास बसस्थानक परिसरात रास्ता रोको आंदोलन (agitation) करत विविध घोषणाबाजी करण्यात आल्या.

रास्ता रोकोमुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्या होत्या. मोर्चाच्या वतीने अपर अधिक्षक माधुरी कांगणे, पोलीस उपअधिक्षक सोमनाथ तांबे, प्रांताधिकारी पुजा गायकवाड, तहसिलदार राहुल कोताडे यांना निवेदन देत घटनेची सखोल चौकशी करुन युवतीला न्याय देण्याची मागणी करण्यात आली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com