टोल नाक्याच्या विरोधात सर्वपक्षीय नेत्यांचा एल्गार

टोल नाक्याच्या विरोधात सर्वपक्षीय नेत्यांचा एल्गार

पेठ | Peth

नाशिक - पेठ - धरमपुर (Nashik-Peth-Dharampur) या राष्ट्रीय महामार्ग (National Highway)क्र. ८४८ वर चाचडगाव नजीक टोलनाका (Chachadgaon Toll Plaza) बसवतांना पेठ तालुका (Peth Taluka) वासीयांकडून होणाऱ्या टोल वसुलीच्या विरोधात सर्वपक्षीय नेत्यांनी पक्षभेद विसरून एकत्र येत दोन तासाहून अधिक वेळ रास्ता रोको केला...

नाशिक - पेठ - धरमपुर महामार्गासाठी पेठ तालुकावासीयांनी जमीनी दिल्या आहेत. रस्ता निर्माण कालावधीत प्रचंड त्रास सोसुनही वाहनांचा कर माफ करण्याऐवजी कर आकारणी होत असल्याने अनेक दिवसांपासून येथील नागरिकांचा उद्रेक वाढत होता. त्यामुळे आज सर्वपक्षीय नेत्यांकडून रास्ता रोको करण्यात आला.

तसेच दिंडोरी व पेठचे उपविभागीय अधिकारी (Dindori and Peth Sub Divisional Officer) डॉ. संदीप आहेर (Dr.Sandeep Aher) आणि पो. उपअधीक्षक अमोल गायकवाड (Amol Gaikwad) यांच्या समक्ष चर्चा केल्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला.

यावेळी भास्कर गावीत, माजी आमदार धनराज महाले (Former MLA Dhanraj Mahale) नगराध्यक्ष करण करवंदे, विशाल जाधव, याकुब शेख, जाकीर मनियार, माजी नगराध्यक्ष मनोज घोंगे, विलास अलंबाड, यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com