सर्वपक्षीय नगरसेवकांचे पालकमंत्री भुजबळांना विविध मागण्यांचे साकडे

सर्वपक्षीय नगरसेवकांचे पालकमंत्री भुजबळांना विविध मागण्यांचे साकडे

येवला। प्रतिनिधी Yevla

येवला नगरपालिकेमध्ये एकूण 16 पदे अद्याप रिक्त असल्याने, इतर विभागातील कर्मचार्‍यांवर पालिकेच्या कामकाजाचा बोजा पडत आहे. त्यामुळे अपूर्ण अधिकार्‍यांच्या संख्या मुळे शहराचा विकास करताना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या प्रश्नाकडे लक्ष वेधत सर्वपक्षीय नगरसेवकांच्या गटाने पालकमंत्र्यांना पदांवर त्वरित योग्य व्यक्तींची नियुक्ती करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

पालकमंत्री भुजबळ ( Guardian Minister Bhujabal ) हे येवला दौर्‍यावर आले असताना संपर्क कार्यालय येथेे मतदार संघातील नागरिकांच्या भेटीगाठी आयोजित केल्या होत्या याप्रसंगी येवला नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षांसह सर्वपक्षीय शिष्टमंडळाने पालकमंत्र्यांची भेट घेऊन सर्वप्रथम पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नाने येवल्याचा साठवण तलाव तुडुंब भरला याबद्दल समस्त येवलेकर जनता व नगरपालिकेच्या वतीने भुजबळांचा सत्कार करण्यात आला.

येवला नगरपालिकेच्या मागील वर्षापासून बदली झालेल्या संगणक अभियंता विद्युत अभियंता स्वच्छता अभियंता व नगरपरिषद जलदाय, अग्निशमन, रचनाकार विभाग विभागातील श्रेणी अ ब क मिळून एकूण 16 पदे अद्याप रिक्त असून, वरील पदांवर त्वरित योग्य व्यक्तींची नियुक्ती करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली असून भुजबळांनी निवेदन स्वीकारून आपल्या स्वीय सहाय्यक यांना त्वरित याबद्दल पुढील कार्यवाहीच्या सूचना दिल्या.

याप्रसंगी उपनगराध्यक्ष सुरज पटनी, राष्ट्रवादी काँग्रेस गटनेते प्रवीण बनकर, अपक्ष गट नेते रुपेश लोणारी, संतोष परदेशी, मलिक मेंबर, शिवसेना गट नेते दयानंद जावळे, शफिक शेख अमजद शेख निसार लिंबू वाले, सरोजिनी वखारे छाया देसाई आदी नगरसेवक उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com