न्यायालय निर्देशानुसार मनपाच्या सर्वच मिळकती बाजारमूल्य दराने देणार
न्यायालय निर्देशानुसार मनपाच्या सर्वच मिळकती
नाशिक

न्यायालय निर्देशानुसार मनपाच्या सर्वच मिळकती बाजारमूल्य दराने देणार

Gaurav Pardeshi

Gaurav Pardeshi

नाशिक । NASHIK (प्रतिनिधी)

नाशिक महापालिका क्षेत्रात महापालिकेकडून लाखो-कोट्यवधी रुपये खर्च करुन बांधलेल्या समाजोपयोग मिळकती नगरसेवक संबंधीत संस्थांना नाममात्र दराने देण्याला आता प्रशासनाने ब्रेक लावला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आता या मिळकतीचे बाजारमुल्य दर काढून नंतर जाहीर लिलाव पध्दतीने मिळकती भाडेपट्ट्याने देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. यामुळे अशा मिळकती नगरसेवकांच्या संबंधीत संस्थाना घेता येणार नसल्याचे मोठी अडचण निर्माण झाली आहे.

नाशिक शहरातील महापालिकेच्या अनेक मिळकती अनेक वर्षांपासून आजी माजी नगरसेवकांच्या संबंधीतांच्या ताब्यात होत्या. मात्र दोन वर्षापूर्वी तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महापालिकेच्या मिळकतीचा सर्व्हे केल्यानंतर अनेक धक्कादायक प्रकार समोर आले होते.

अनेक मिळकती विना करार नगरसेवकांच्या ताब्यात असल्याचे आणि करार संपल्यानंतर मिळकती ताब्यात असल्याचा प्रकार समोर आला होता. तसेच अनेकांनी नाममात्र भाडे देखील भरलेले नव्हते.

याच पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयात दाखल एका जनहित याचिकेत सार्वजनिक वापराच्या मिळकती 10 पैसे चौ. फूट या नाममात्र देण्याचा ठराव महासभेने 2006 रोजी केला असल्याने या ठरावावर न्यायालयाने अंतरीम आदेश दिलेले आहे.

तसेच राज्य शासनाने जो मोबदला घेऊन महापालिकेच्या मालकीची कोणतीही स्थावर मालमत्ता किंवा कोणतीही हक्क विकता येईल, पट्याने देता येईल किंवा अन्यता हस्तांतर करता येईल, तो मोबादला असे अधिमुल्य भाडे किंवा अन्य मोबदला यांच्या चालु बाजार किंमतीपेक्षा कमी असता कामे नये अशी तरतुद केली आहे.

शासनाचे अंतरीम आदेश व शासनाची नवीन अधिसुचना यामुळे आता महापालिकेच्या मिळकती देता येणार नाही. याच पार्श्वभूमीवर शहरातील मिळकती नाममात्र भाडेपट्ट्याने देण्याची सामाजिक संस्थांची मागणी आता बिनकामाची ठरणार आहे.

अशाप्रकारे मिळकतींची मागणी झाल्यास प्रशासनाकडुन मिलकतीच्या बाजारमूल्य दरानुसार लिलाव करुन या मिळकती देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असुन यासंदर्भात हालचाली सुरु झाल्या आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com