उद्यापासून नाशिकमधील सर्व बांधकाम साईट्स बंद

उद्यापासून नाशिकमधील सर्व बांधकाम साईट्स बंद

बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचा निर्णय

नाशिक | प्रतिनिधी

जनता कर्फ्यूच्या आवाहनाला प्रतिसाद देण्यासाठी बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व लहान-मोठ्या बिल्डर्स, कॉन्ट्रॅक्टर्स यांनी आपली चालणारी कामे, साईट तसेच इतर कामे दि. 21 एप्रिल ते दि.1 मे दरम्यान बंद ठेवण्याचे आवाहन बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया च्या नाशिक शाखेचे अध्यक्ष अभय चोकसी यांनी केले आहे...

नाशिक जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची स्थिती, वाढणारी संख्या ही भीतीदायक झाली आहे. आज लोकसंख्या आणि कोरोना बाधित यांची तुलना केल्यास नाशिक सर्वात अग्रस्थानी असून शासन, प्रशासन, पोलिस व आरोग्य सेवा देणारे सर्वच जणांवर प्रचंड ताण पडतो आहे.

रुग्णांना सेवा देणारी यंत्रणा कोलमडून पडण्याची स्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत या सर्व यंत्रणेवर पडणारा ताण कसा कमी करता येईल हे बघणे आपले कर्तव्य आहे.

पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेवरून कोरोना या विषाणूची साखळी तोडण्यासाठी शहरात चालणारी कामे, साईट तसेच इतर कामे दि. 21 एप्रिल ते दि.1 मे दरम्यान बंद ठेवण्याचा निर्देश सर्व संबंधितांना देण्यात आले असल्याचेही अध्यक्ष अभय चोकसी सचिव विजय बाविस्कर, माजी राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश पाटील व अन्य सभासदांनी नमूद केले आहे,

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com