हॉटेल व्यवसायिकांनो सावधान!

रात्री नऊ नंतर पाच पेक्षा जास्त व्यक्ती दिसल्यास त्यांच्यासह तुमच्यावरही कारवाई
हॉटेल व्यवसायिकांनो सावधान!
USER

नाशिक | प्रतिनिधी Nashik

31 डिसेंबरची 31st December 2021 रात्र जल्लोषात साजरी करण्यासाठी यंदाही आयुक्तालयातर्फे विरोध दर्शविण्यात आला असून रात्री नऊ वाजेनंतर कुठल्याही हॉटेलमध्ये Hotel पाच पेक्षा जास्त संख्येने कुणी दिसल्यास त्यांच्यावर व हॉटेलवर देखील पोलीस कारवाई करणार आहेत.

सध्या ओमायक्रॉन Omicron विषयानुसार देशभरात प्रसार होत असल्याने राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार रात्री नऊ ते सकाळी सहा वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. यामध्ये पाचपेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र येऊ नये असे सांगितले गेले आहे, त्यानुसार नाशिक पोलीस आयुक्तांनी Nashik police Commissioner परिपत्रक काढून नागरिकांना आवाहन केले होते.

दरम्यान 31 डिसेंबर म्हणजे वर्ष अखेर हा दिवस साजरा करण्याकरता बरीचशी लोक एकत्र येतात त्यांनी रात्री नऊ वाजेपर्यंत कुठली हॉटेल, लॉन्स, मंगल कार्यालय या ठिकाणी दिलेल्या नियमानुसार आले तर चालणार आहे. मात्र रात्री नऊ वाजेनंतर शहरातील कुठलाही हॉटेल किंवा अन्य परिसरामध्ये कुणी पाचपेक्षा जास्त संख्येने आल्यास त्यांच्यावर कारवाई होणार आहे. आणि हा नियम हॉटेल चालक व मालकांवर देखील बंधनकारक करण्यात आल्याने यावर्षी देखील हॉटेल व्यावसायिकांना आर्थिक फटका बसणार आहे.

31 डिसेंबरच्या रात्री काही उत्साही कार्यकर्ते हे आपल्या घरी बाहेरच्या मंडळींना घेऊन जर पार्टी करण्यासाठी बसले असतील आणि त्यासंदर्भात जर पोलिसांना तक्रार आली व त्याठिकाणी पाच पेक्षा जास्त व्यक्ती आढळून आल्यात तर पोलिसांतर्फे सर्व व्यक्तींना कारवाईला सामोरे जावे लागेल असेदेखील आयुक्तालयातर्फे कळविण्यात आले आहे. दरम्यान ड्रिंक अँड ड्राइव्ह Drink & Drive कुणी आढळून आले तर त्यांना देखील कारवाईला सामोरे जावे लागेल. त्यामुळे नाशिककरांना यावर्षी देखील 31 डिसेंबर हा घरातच साजरा करावा लागेल अन्यथा पोलीस कारवाई करणार.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com