दारूच्या नशेत तरुणांकडून पोलिसांना शिवीगाळ

दारूच्या नशेत तरुणांकडून पोलिसांना शिवीगाळ

सप्तशृंगी गड | वार्ताहर | Saptashrungi gad

नवरात्रोत्सव काळात सप्तशृंगी गडावर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार वाहनांना बंदी घालण्यात आलेली आहे. काल रात्री नांदुरी पोलीसगेट येथे काही तरुणांनी सप्तशृंगी गडावर वाहने सोडत नसल्याने पोलीस प्रशासनाला शिवीगाळ करून गोंधळ घालण्याचा प्रकार घडला आहे...

काल रात्री नांदुरी येथे नवरात्रोत्सवानिमित्त बंदोबस्तासाठी आलेल्या पोलीस निरीक्षक व कर्मचाऱ्यांना अरेरावांची भाषा वापरून आमची गाडी सप्तशृंगी गडावर सोडा अशी वागणूक मालेगाव तालुक्यातील आठ ते दहा जणांनी कायदा सुव्यवस्थेचे उल्लंघन केले आहे.

याबाबत पोलीस प्रशाशनाने समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र मध्यधुंद नशेत असलेल्या तरुणांनी पोलिसांच्या अंगावर येऊन त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी आरसीपी पथक दाखल होताच तरुणांनी पळ घटनास्थळावरून पळ काढला. याबाबत पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली आहे.

सप्तशृंगी गडावर येणाऱ्या भाविकांना पास हे फक्त ग्रामस्थ, शासकीय अधिकारी व महापूजा करणारे भाविक व ग्रामस्थ यांच्यासाठी तहसीलदार कार्यलयात असतात. गडावर जाणाऱ्या प्रत्येक वाहनाचा परवाना बघूनच आम्ही वाहने सोडतो. त्यामुळे दर्शनाला येणाऱ्या भाविकांनी पोलिसांना सहकार्य करावे

- सचिन राऊत, पोलीस कर्मचारी

पोलीस प्रशाशन योग्य ती खबरदारी घेऊन 24 तास कार्यरत आहे. मात्र दारूच्या नशेत असलेले युवक पोलिसांना दादागिरीची भाषा वापरल्याचा व्हिडिओ काढला आहे. कायद्याचे उल्लंघन करून पोलिसांवर कोणी दबाब टाकत असेल तर त्याचा आम्ही निषेध व्यक्त करतो

- संतोष निकम, राष्ट्रीय अध्यक्ष, विश्वागामी पत्रकार संघ.

Related Stories

No stories found.