दारु बंदी ठराव मंजूर

दारु बंदी ठराव मंजूर

मोहबारी । वार्ताहर | Mohbari

कळवण तालुक्यातील (kalwan taluka) हिंगवे गावात दारू बंदीसाठी गावातील (Alcohol ban) नारी शक्ती एकत्र येत गावात संपूर्ण दारु बंदी ठराव मंजूर करण्यात आले असून दारू विक्री (Liquor sales) केल्यास 11 हजाराचा दंड (Penalty) आकरण्यात येणार आहे.

गु्रपग्रामपंचायत (gram panchyat) हिंगवे अंतर्गत मौजे हिंगवे गावात 20 ते 25 वर्षापासून दारू बंदी असतांना गावात मागील पाच सहा महिन्यापासून दारू विक्री पुन्हा सुरू झाली होती. यामुळे गावात वेशनाधिनतेचे प्रमान मोठ्या प्रमाणात वाढले होते. याचा मानसिक ताण (Mental stress) आणि वाईट परिणाम गावातील महिलांना सोसावे लागत होते.

अखेर गावातील महिलांनी कंटाळून गावातील प्रतिष्ठीत नागरीक कळवण तालुका (kalwan taluka) पंचायत समितीचे (panchayat samiti) माजी उपसभापती रमेश आहेर (Former Deputy Speaker Ramesh Aher) यांच्या कानावर हा प्रकार टाकण्यात आले.

यानंतर गावातील महिलांसोबत आहेर यांनी ग्राम पंचायत कार्यालय हिंगवे येथील सरपंच निलेश बागूल यांना दारू बंदी संदर्भातील निवेदन (memorandum) देत गावातील सर्व नागरिक एकत्र येत सर्वानूमते व्यसन मुक्त गावाचे ठराव करण्यात आले. तसेच गावात दारू विक्री करणार्‍या इसमास बोलावून यापुढे दारू विक्री करायची नाही अशी यावेळी सूचना देण्यात आली. याप्रसंगी पंचायत समितीचे माजी उपसभापती रमेश आहेर, सरपंच निलेश बागुल, सुदाम बागुल, उत्तम बागुल, कैलास आहेर, मधुकर गांगुर्डे, वंकर गांगुर्डे, सुनिल बागुल, ज्ञानेश्वर महाले, कांतीलाल आहेर तसेच गावातील ग्रामस्थ, महिला आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com