अक्षय कुमार दौरा
अक्षय कुमार दौरा
नाशिक

चौकशीचे हेलिकाॅप्टर उडवल्यानंतर दुपारी क्लिनचिट देत लॅण्डिंग

अक्षय कुमारचा नाशिक दौरा

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक : अभिनेता खिलाडी अक्षय कुमारच‍ा नाशिक दौरा वादाचा भवर्‍यात सापडला असून त्यांच्या हेलिकाॅप्टर लॅण्डिंगला कोणी परवानगी दिली असा प्रश्न उपस्थित करत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी या प्रकरणाची जिल्हाधिकार्‍यांनी माहिती घेऊन चौकशी करावी असे आदेश दिले होते. मात्र काही वेळातच भुजबळ यांनी अक्षय कुमारला क्लिनचीट दिली. तसेच जिल्हा प्रशासनाने देखील चौकशी होणार नाही असे संकेत दिले अाहे. एकूणच शनिवारी दिवसभर अक्षय कुमारच्या दौर्‍याबाबत चौकशीचे हेलिकाॅप्टर घिरट्या घालत असताना सायंकाळपर्यंत या सर्व प्रकरणाला क्लिनचिट देत हेलिकाॅप्टरचे जमिनीवर लॅण्डिंग करण्यात आले.

भुजबळ यांनी शनिवारी (दि.४)ठक्कर डोम येथे उभारण्यात आलेल्या कोव्हिड सेंटरची पाहणी केली. यावेळी पत्रकारांनी अक्षय कुमारच्या हेलिकाॅप्टर लॅण्डिंगबाबत विचारले असता भुजबळांनी जिल्हाधिकार्‍यांनी माहिती घेऊन चौकशीचे आदेश दिले होते. करोना संकटात मुख्यमंत्री ठाकरेंपासून सर्व मंत्री हेलिकाॅप्टर ऐवजी वाहनाने प्रवास करत आहे. हवाई प्रवास व परवानग्या शक्यतो टाळल्या जात आहे. असे असताना अभिनेता अक्षय कुमारला नाशिकमध्ये हेलिकाॅप्टर लॅण्डिंगची परवानगी कोणी दिली याबाबत वाद निर्माण झाला आहे. बुधवारी अक्षय कुमार नाशिकमध्ये आला होता. सपकाळ नाॅलेज हबच्या हेलिपॅडवर अक्षय कुमारचे खासगी हेलिकाॅप्टर लॅण्ड झाले होते. या लॅण्डिगला जिल्हा प्रशासनाची परवानगी कोणी दिली हा मुद्दा वादाच्या भवर्‍यात अडकला आहे. शिवाय सपकाळ नाॅलेज हब हे ग्रामीण पोलिसांच्या हद्दित येत असताना शहर पोलिसांनी सुरक्षा दिली कशी, हा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.तसेच रिसॉर्ट मध्ये राहण्याची परवानगी कशी मिळाली याबाबत देखील वाद निर्माण झाले आहे. या सर्व प्रकरणाची माहिती घ्यावी असे भुजबळांनी जिल्हाधिकार्‍यांना सांगितले. मात्र, थोड्याच वेळात भुजबळ फार्मवरुन अक्षय कुमारच्या दौर्‍याबाबत संदिग्गता नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.

जिल्हाधिकार्‍यांनी सदर प्रकरणाबाबत माहिती दिली. अभिनेता अक्षय कुमार हे डॉ.आशर यांच्याकडे उपचार घेत असून तपासणीसाठी ते नाशिकमध्ये आले होते. अक्षय कुमार यांनी कोविडच्या पार्श्वभूमीवर केलेल्या चांगल्या सामाजिक कार्याबद्दल पोलिस आयुक्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी गेले होते. पोलिसांचा एस्कॉट हा अक्षय कुमार यांच्यासाठी नव्हे तर पोलीस आयुक्तांसोबत होता. त्यामुळे या प्रकरणात आता कुठलीही संदिग्धता राहिली नाही.

- छगन भुजबळ, पालकमंत्री

याबाबत पालकमंत्री छगन भुजबळ यांना माहिती देण्यात आली आहे. त्यांनी याबाबत भुमिका स्पष्ट केली आहे.

- सूरज मांढरे, जिल्हाधिकारी

उड्डयण विभागाने हेलिकाॅप्टर लॅण्डिंगसाठी परवानगी मागितली होती. हेलिपॅड हे ग्रामीण पोलिसांच्या हद्दित असल्याने त्यांची एनअोसी घेऊन नियमानूसारच लॅण्डिगची परवानगी देण्यात आली.

- भागवत डोईफोडे, निवासी उपजिल्हाधिकारी

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com