संमेलनगीताचा वाद मिटता मिटेना; शाहिरांच्या फोटोवरून नवा पेच
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २०२१

संमेलनगीताचा वाद मिटता मिटेना; शाहिरांच्या फोटोवरून नवा पेच

नाशिक । प्रतिनिधी Nashik

९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (akhil bharatiy marathi sahitya sammelan 2021) अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपलेले असले तरी संमेलनगीताबाबत (Sammelan Song)असलेला वाद मिटता मिटत नसल्याचे चित्र दिसत आहे. शाहिर (Shahir), कवी (poet), साहित्यिक (writers) यांच्या फोटोंचा समावेश गीतात करण्यात आला मात्र शाहिरांचा फोटोच बदलवला असल्याचे एका वर्गाने म्हटले असून आता नवा पेच आयोजकांपुढे पडला आहे....

दरम्यान, भूमीपूजनाच्या कार्यक्रमात मिलिंद गांधी (Milind Gandhi) आणि संजय गीते (Sanjay Gite) यांनी बनविलेल्या गाण्याचे प्रकाशन झाले. यामध्ये जिल्ह्यातील साहित्यिकांची मांदियाळी शब्दरूपात आणि फोटो रुपात दाखविण्यात आली. मात्र यामधील शाहीर प्रताप परदेशी यांच्याऐवजी दुसराच फोटो लावला गेला असल्याचे सांगितले जात आहे.

याबाबत नाशिक जिल्ह्यातील राणा की सेना संघटनेने (Rana ki sena sanghtna) गीतामधील शाहीर प्रताप परदेशी (Shahir pratap pardeshi) यांचा फोटो चुकीचा झाल्याबद्दल पत्र लिहिले आहे.

यामध्ये कै.शाहीर प्रताप परदेशी यांचा उल्लेख केल्याबद्दल आभार तर मानलेच आहे. सोबतच शाहिरांचा खरा फोटो देखील उपलब्ध करून दिलेला आहे. यामुळे नवा पेच आता उभा राहिला असून साहित्य संमेलन आयोजकांकडून याबाबत कुठलेही भाष्य यावर करण्यात आले नाही.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com