खुशखबर! नववर्षात नाशिकहून 'या' शहरांसाठी सुरु होणार विमानसेवा

खुशखबर! नववर्षात नाशिकहून 'या' शहरांसाठी सुरु होणार विमानसेवा

नाशिक | Nashik

मार्च महिन्यापासून नाशिकमधून (Nashik)विविध शहरांसाठी विमानसेवा सुरू करण्यास विमान कंपन्या सज्ज झाल्या असून स्पाइस जेट व इंडिगो (Spice Jet and Indigo)विमान कंपनीने विमानसेवा सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आहे...

नाशिक येथून दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद, अहमदाबाद, पुणे, नागपूर या शहरांना जोडणाऱ्या विमानसेवा सुरू करण्याबाबत दोन्ही विमान कंपन्यांनी वेळापत्रक विमान इव्हिनेशन अॅथॉरिटीकडे पाठवले आहे. त्यात प्रामुख्याने २६ मार्च ते २६ ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या फेस्टिवल काळातील पर्यटन (Tourism) डोळ्यासमोर ठेवण्यात आला आहे.

तसेच आगामी वर्षात इंडिगो विमान कंपनीद्वारे नाशिकहून गोवा, आमदाबाद, नागपूर व हैदराबादसाठी विमानसेवा सुरू होणार आहे. तर स्पाइस जेट विमान कंपनीच्या माध्यमातून दिल्ली, हैदराबाद, बंगळुरू, अहमदाबाद व गोवा या शहरांसाठी विमानसेवा सुरू केली जाणार आहे.

दरम्यान, दोन्ही विमान कंपन्यांनी (Airlines)२६ मार्च ते २६ ऑक्टोबर दरम्यानचा प्रस्ताव दिला असल्यामुळे मार्च महिन्यापासून नाशिकमधून नऊ शहरे विमानसेवेने जोडले जाणार आहे. त्यामुळे पर्यटकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळणार आहे.

विमानसेवा सुरु करण्यासाठी विमान कंपन्या पुन्हा एकदा सज्ज झाल्या असून शहराला देशातील विविध शहरांना जोडण्याचे काम गतिमान झाले आहे. आगामी काळात आणखी विमानसेवा सुरू होण्यासोबतच नाईट लँडिंग व एम आर ओ कार्यान्वित झाल्यास नाशिक शहराची विमानसेवा सक्षमपणे चालू राहण्यास मदत होईल.

मनीष रावल (एव्हिएशन कमिटी आयमा)

असे आहे संभाव्य वेळापत्रक

स्पाईसजेंट कंपनी

शहराचे नाव - सुटण्याची वेळ - पोहचण्याची वेळ

नाशिक - दुपारी २.५० - दुपारी ४.४० (नवी दिल्ली)

नवी दिल्ली - दुपारी १२.३५ - दुपारी २.४० (नाशिक)

नाशिक - सकाळी ८.२० - सकाळी ९.५५ (हैदराबाद)

हैदराबाद - सकाळी ६.२० - सकाळी ७.५५ (नाशिक)

नाशिक - सकाळी १०.२५ - दुपारी १२.०० (अहमदाबाद)

अहमदाबाद - दुपारी १२.३० - दुपारी २.०५ (गोवा)

बंगळुरू - सकाळी ७.५५ - सकाळी १०.०५ (नाशिक)

गोवा - रात्री ४.३० - रात्री ५.४० (नाशिक)

नाशिक - रात्री ८,०० - रात्री ८.१० (बंगळुरू

इंडिगो कंपनी

शहराचे नाव - सुटण्याची वेळ - पोहचण्याची वेळ

हैदराबाद - सकाळी ६.५५ - सकाळी ८.५५ (नाशिक)

नाशिक - दुपारी १३.५५ - दुपारी ३.२० (अहमदाबाद)

गोवा - सकाळी ११.४० - दुपारी १.३५ (नाशिक)

नाशिक - सकाळी ९.१५ - सकाळी ११.२० (गोवा)

अहमदाबाद - दुपारी ३.४० - सायंकाळी ५.०५ (नाशिक)

नाशिक - सायंकाळी ५.२५ - रात्री ७.१५ (नागपूर)

नागपूर - रात्री ७.३५ - रात्री ८.२५ (नाशिक)

नाशिक - रात्री ८.४५ - रात्री ११.४० (हैदराबाद)

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com