नाशिकहून 'या' तीन शहरांसाठी विमानसेवा होणार सुरु

तिकीट आरक्षणास सुरुवात
नाशिकहून 'या' तीन शहरांसाठी विमानसेवा होणार सुरु

नाशिक । प्रतिनिधी Nashik

इंडिगो विमान कंपनीद्वारे 1 जूनपासून इंदोर, हैदराबाद व अहमदाबाद या नवीन तीन मार्गांवर विमानसेवा सुरू करण्यात येत असून, या विमानसेवेसाठी प्रवाशांंचे तिकीट आरक्षण सुरू करण्यात आले आहे. येत्या 1 जूनपासून या तीनही शहरांसाठी नवीन विमानसेवांची भर पडणार आहे.

इंडिगो विमान कंपनीच्या माध्यमातून नाशिक ते हैदराबाद (व्हाया नागपूर), नाशिक-इंदोर आणि नाशिक-अहमदाबादसाठी विमानसेवा 1 जूनपासून सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या तीनही शहरांसाठी विमानांच्या फेर्‍या दररोज राहणार आहेत.

दरम्यान, हैदराबाद येथून सकाळी 11.30 वाजता विमान निघून नाशिक विमानतळावर ते 12.30 वाजता पोहोचणार आहे. तसेच परतीचा प्रवास करताना नाशिकहून दु. 2.45 वा निघून हैदराबाद येथे सायं 4.30 वा पोहोचणार आहे. तसेच इंदोर येथून दु. 1.15 वा. विमान निघून नाशिकला 2.25 वा. पोहोचणार आहे. तर नाशिकहून 12.50 वाजता निघून इंदोर येथे 2.00 वा. पोहोचणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

इंडिगोचे अहमदाबाद शहरासाठी एक विमान आधीच चालत आहे. त्याव्यतिरिक्त दुसरे विमान अहमदाबादहून सकाळी 8 वा. निघून नाशिक विमानतळावर सकाळी 9.25 वाजता पोहोचणार आहे. तर नाशिकहून 9.45 वाजता निघून अहमदाबाद विमानतळावर सकाळी 11.05 वाजता पोहोचणार आहे. लवकरच दिल्ली, जयपूर, बंगळुरू शहरांसाठी इंडिगोतर्फे विमानसेवा देण्याचा मानस असल्याचे सूत्रांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com