नाशकात विमानसेवा पूर्वपदावर; एमआरओला प्रतिसाद

नाशकात विमानसेवा पूर्वपदावर; एमआरओला प्रतिसाद

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

करोनामुळे (Corona) विमानसेवा बंद करण्यात आली होती. मात्र आता करोनाची लाट ओसरल्याने बंद करण्यात आलेली विमानसेवा पुन्हा एकदा सूरू झाली. विमानसेवा सूरू होताच प्रवाशांचा प्रतिसाद वाढू लागला आहे...

मागील वर्षापासून नाशिकमध्ये (Nashik) ट्रुजेट विमान कंपनीच्या (TruJet) माध्यमातून नाशिक-अहमदाबाद (Nashik-Ahmedabad) सेवा सूरू करण्यात आलेली होती.

त्यात इंदूरच्या (Indore) हॉपिंग सेवेची वाढ करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता ही सेवा नाशिक-अहमदाबाद-इंदूर (Nashik-Ahmedabad-Indore) अशी झाली आहे.

बूधवारी व शनिवारी ही सेवा बंद ठेवली जाणार आहे. ’अलायन्स एअर’ (Alliance Air) कंपनीची नाशिक-हैद्राबाद, नाशिक -दिल्ली विमान सेवा सूरू होती. मात्र दिल्ली विमानसेवेला परवानगी न मिळाल्याने नाशिक-अहमदाबाद-दिल्ली अशी सेवा दिली जात आहे.

थेट सेवा मिळत असल्याने प्रवाशांची संख्यादेखील वेगाने वाढत आहे. ’स्टार एअर’ (Star Air) या विमान कंपनीद्वारे नाशिक बेळगाव सेवा सूरू करण्यात आलेली होती. ती पूर्वपत सूरू करण्यात आलेली आहे.

’स्पाइस जेट’ (SpiceJet) या वर्षी ऑक्टोंबरपासून नाशिकहून सेवा सूरू करण्याची शक्यता आहे. यापूर्वी ही सेवा नाशिक-दिल्ली, नाशिक-बंगळूरु, नाशिक-हैद्राबाद या शहरांसाठी होती. ती पूर्वपत सूरू करण्याच्या दृष्टीने तयारी जोर धरु लागल्याचे चित्र आहे.

इंडिगो विमान कंपनीदेखील (IndiGo) नाशिकहून विमान सेवा सूरू करण्याबाबत विचार करीत आहे. त्यादृष्टीने सोयीचे शहर कोणते याची चाचपणी केली जात असल्याचे समजते. करोनाची दूसरी लाट (Corona Second Wave) ओसरल्यानंतर विमान कंपन्यांनी जूनपासून आपली सेवासूरू करण्याचा प्रयत्न चालवला होता.

त्यात ट्रुजेट, अलायन्स एअर, स्टार एअर या कंपन्यांची उड्डाणे पूर्ववत झाली. जुलै आणि ऑगस्ट मिळून 10 हजार नागरीकांनी नाशिकहुन विमान सेवेचा लाभ घेतला.

एमआरओला वाढतोय प्रतिसाद

नाशिक विमानतळावर सुरु करण्यात आलेल्या मेन्टेनन्स, रिपेअर व ओवर ऑइलिंग (एमआरओ) या सेवेलाही प्रतिसाद मिळत आहे. काही खासगी कंपन्यांनी आपल्या विमानांची देखभाल दुरुस्ती केल्याचे आयमाचे विमान सेवा उपसमितीचे अध्यक्ष मनीष रावल (Manish Rawal) यांनी सांगितले.

डीजीसीएने विमान सेवांसाठी लावलेले निर्बंध कमी केले आहे.करोनामुळे विमान उड्डाणासाठी ठेवलेले 50 टक्यांचे निर्बंध शिथिल करुन ते मागील महिन्यात 65 टक्के केले होते. आता त्यात आणखी सूधारणा करुन ते 72.5 टक्यांवर आणल्याने आणखी काही क्षेत्रात विमानसेवा सुरु करणे शक्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com