सोमवारपासून एअर रायफल, पिस्तूल प्रशिक्षण

सोमवारपासून एअर रायफल, पिस्तूल प्रशिक्षण
File Photo

नाशिक | दि. २५, प्रतिनिधी

नासिक जिमखान्याच्या (nasik gymkhana) शुटिंग रेंजवर विंनर्स शुटिंग क्लब यांच्या सहकार्याने १० मि. एअर रायफल (Air Rifle) व एअर पिस्तूल (Air Pistol) प्रशिक्षण शिबिर (Training camp) दि. २७ डिसेंबर २०२१ ते दि. १ जानेवारी २०२२ दरम्यान सायंकाळी ६ ते ७ या वेळेत होणार आहे. हे प्रशिक्षण श्रध्दा नालमवार (Shraddha Nalamwar) या आंतरराष्टीय खेळाडू व पंच या देणार आहेत...

प्रशिक्षण केंद्रावर १० मि. एअर रायफल, एअर पिस्तूल ऑलिम्पिक क्रीडा प्रकारांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. वय वर्षे ११ च्या पुढील कोणतीही व्यक्ती या प्रशिक्षण शिबिरात सहभागी होऊ शकते.

शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांना आंतरशालेय स्पर्धामध्ये सहभागी होण्यासाठी मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच महाविद्यालय स्तरावर नेमबाजी (Shooting) स्पर्धेत सहभागी होण्यासाठी देखील या शिबिराचा फायदा होईल.

या प्रशिक्षण केंद्राचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा आणि अधिक माहितीसाठी नासिक जिमखाना कार्यालय येथे संपर्क साधावा असे आवाहन नासिक जिमखाना अध्यक्ष नरेंद्र छाजेड व सचिव राधेश्याम मुंदडा यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com