आयमाचे कार्य उल्लेखनीय : खा. गोडसे

आयमाचे कार्य उल्लेखनीय  : खा. गोडसे

नाशिक । प्रतिनिधी Nashik

अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) AIMA या औद्योगिक संस्थेचा 36 वा वर्धापन उत्साहात साजरा करण्यात आला.

नुकतेच करोना corona महामारीच्या संकटास सामोरे जाताना व नियमांचे पालन करताना आयमाचा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी उद्योजक रवींद्र झोपे सपत्नीक यांच्या हस्ते सत्यनारायण पूजन करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी आयमा रिक्रिएशन सेंटरला AIMA Recreation Center भेट देऊन 36 व्या वर्धापन दिनानिमित्ताने शुभेच्छा दिल्या.

यात प्रामुख्याने खा. हेमंत गोडसे MP Hemant Godse व आ. सीमा हिरे MLA Sima Hire यांनी आयमा पदाधिकारी व उद्योजक यांच्याशी झालेल्या चर्चेत कोविड काळातील आयमाने अंबड, सातपूर, सिन्नर औद्योगिक वसाहतीमधील उद्योजक, कामगार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी केलेल्या कार्याचे कौतुक केले.

यावेळी आयमांचे अध्यक्ष वरूण तलवार, उपाध्यक्ष निखिल पांचाळ, विश्वस्त समितीचे चेअरमन धनंजय बेळे, सरचिटणीस ललित बूब, आयपीपी राजेंद्र अहिरे, सचिव राजेंद्र पानसरे, योगिता पवार यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.

याप्रसंगी खा. हेमंत गोडसे आमदार सीमा हिरे, नगरसेवक राकेश दोंदे, निमांचे माजी अध्यक्ष मधुकर ब्राह्मणकर, विवेक गोगटे, डी. जी. जोशी, आयमांचे माजी अध्यक्ष जे. एम. पवार यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी महानगरपालिका, डीआयसी, एमआयडीसी, विद्युत वितरण कंपनी, इतर शासकीय भागाचे अधिकारी, आयमा, निमा, नाईस, निवेक, लघुउद्योग भारती, क्रेडाई, ट्रान्सपोर्ट असोसिएशन, रोटरी क्लब, निपमचे सभासद उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com