आयामा इंडेक्स प्रदर्शन उभारणीचा प्रारंभ

आयामा इंडेक्स प्रदर्शन उभारणीचा प्रारंभ

उद्योग क्षेत्रात आणखी दोन ते तिन मोठे उद्योग येणार-गवळी

सातपूर | प्रतिनिधी | Satpur

उद्योगांच्या विकासासाठी शासन प्रशासन अग्रेसर भूमिका घेत आहेत. नाशिकला (nashik) मोठ्या प्रमाणात उद्योग उभारणीला गती (Accelerate industry building) मिळत आहे. दोन ते तिन मोठे उद्योग येऊ घातलेले आहेत.

त्यांची घोषणा आयमाच्या प्रदर्शन स्थळावर होण्याची शक्यता एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी (MIDC Regional Officer Nitin Gawli) यांनी सांगितली. आयमाच्या (AIMA) वतीने उद्योगांना व्यासपीठ मिळवून देणारे आयमा इंडेक्स (AIMA Index) हे औद्योगिक प्रदर्शन (Industrial expo) येत्या 18 ते 21 दरम्यान डोंगरे वसतीगृह मैदानावर भरणार आहे.

या प्रदर्शनाचे भूमिपूजन (bhumipujan) एमआयडीसीचे (MIDC) नाशिक विभागाचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांच्या हस्ते करण्यात आले पूढे बोलताना नितीन गवळी यांनी कोवीड साथीच्या त्रासातून सावरत असतानाच आयमाचे हे औद्योगिक प्रदर्शन नवीन गुंतवणुकीसाठी फायदेशीर ठरणार असून एमआयडीसीच्या माध्यमातून मोठे उद्योग आणण्यासाठी मीही प्रयत्न करीत असून लवकरच दोन मोठे उद्योग नाशिकमध्ये येणार असल्याचे सांगितले.

कार्यक्रमात व्यासपिठावर आयामा इंडेक्सचे चेअरमन धनंजय बेळे (Dhananjay Bele is the chairman of AIMA Index), आयमा अध्यक्ष निखिल पांचाळ (AIMA President Nikhil Panchal), सरचिटणीस ललित बुब, माजी अध्यक्ष वरुण तलवार, राजेंद्र अहिरे हे होते. यावेळी आयमाचे अध्यक्ष निखिल पांचाळ यांनी या आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शनामुळे (International Industrial Exhibition) औद्योगिक विकासाबरोबरच गुंतवणुकीत मोठी वाढ होणार असल्याचे व नाशिकचे ब्रँडिंग होणार असल्याचे सांगितले.

आयामा इंडेक्स 2022 चे चेअरमन धनंजय बेळे यांनी प्रदर्शनाचे सर्व स्टॉल बुक झाले असून नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानासह सर्व क्षेत्रासाठी प्रगतीसाठी उपयोगी असणार आहे. टाचणी पासून विमाने बनणार्‍या आपल्या नाशिकला नवीन तंत्रज्ञान (New technology) येऊ घातले असून त्यासाठी आयामा इंडेक्स 2022 हे प्रदर्शन उपयुक्त ठरणार असल्याचे ते म्हणाले.

यावेळी प्रायोजकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. भूमिपूजन पूजाविधी विजय जोशी यांनी सपत्नीक पूर्ण केली. पाहुण्यांच्या हस्ते सोन्याच्या कूदळाने भूमिपुजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राजेंद्र अहिरे यांनी तर आभार सरचिटणीस ललित बुब यांनी मानले. यावेळी निमा (NIMA) चे माजी अध्यक्ष डी जी जोशी, आयामा चे माजी अध्यक्ष भास्कर कोतवाल, जे.आर.वाघ, जे.एम.पवार, विवेक पाटील, ज्ञानेश्वर गोपाळे, एस एस आनंद, महाराष्ट्र चेंबरचे सुधाकर देशमुख, नाईसचे रमेश वैश्य,

तुषार अंधृटकर, लघुद्योग भरती चे विवेक कुलकर्णी एमएसएमइ चे प्रदीप पेशकार,संदिप फाऊंडेशनचे ए.आर.मन्सूरी, एचएएलचे श्री जावेद, आयमाचे उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे, सुदर्शन डोंगरे, योगीता आहेर, राजेंद्र कोठावदे, प्रमोद वाघ, विनायक मोरे, दिलीप वाघ, अविनाश मराठे, जयदीप अलिमचंदानी, जगदीश पाटील आदींसह औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी व आयमाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थीत होते

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com