आयमा निवडणूक: मोर्चेबांधणी सुरू

आयमा निवडणूक: मोर्चेबांधणी सुरू

सातपूर । प्रतिनिधी Satpur

आयमा AIMA या उद्योजक संघटनेच्या निवडणुकीसाठी AIMA Election दोन्ही पॅनलद्वारे मोर्चेबांधणी सुरुवात झाली असून, वैयक्तिक संपर्कावर भर देण्यासाठी विविध मुद्द्यांचा आधार घेतला जात असल्याने येत्या 8 दिवस उद्योजकांना उमेदवारांच्या प्रचार भेटीला सामोरे जावे लागणार आहे.

आयमाच्या निवडणुका होतात की तडजोड होणार अशी शंका सातत्याने उपस्थित केली जात होती. कारण सातत्याने चर्चेच्या फेर्‍या दोन्ही घटक सुरू होत्या. मात्र काल माघारीनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाल्याने दोघांनीही निवडणुकीच्या प्रचार यंत्रणेला सक्षम करण्यास सुरुवात केली आहे. विविध गटांचे मोर्चेबांधणी करीत मतदार उद्योजकांपर्यंत पोहोचण्यासाठी नियोजन केले जात आहे. कोणतेही निवडणुका म्हटल्या की दोन गटांत मतदारांना विभागले जाते.

या माध्यमातून उद्योजक, त्यांचे व्हेंडर पुरवठादार, मित्रपरिवार, प्रांतवाद या सर्व बाबींची कडी जोडण्याचे काम गतिमान झाले आहे. या माध्यमातून आपली मव्होट बँकफ तयार करण्यासाठी दोन्ही गटातून मोर्चेबांधणी सुरु झाल्याचे चित्र आहे. या निवडणुकीसाठी प्रत्यक्ष मतदान हे रविवार (दि.30) जानेवारी रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत आयमा रिक्रिएशन सेंटर येथे घेतले जाणार आहे. मोजणी सोमवारी (दि.1) जानेवारी रोजी केली जाणार असून मंगळवारी (दि.2)आयोजित वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये निकाल जाहीर केला जाणार आहे.

एकता पॅनलचा अजेंडा

आयमाच्या माध्यमातून औद्योगिक निर्यातक्षम करण्यासाठी प्रोत्साहन देणे, नाशिकमध्ये डीजीएफटीचे स्थानिक विदेशी व्यापार कार्यालय उघडणे, थेट हवाई मालवाहू निर्यातीसाठी नाशिकमध्ये ड्राय पोर्ट तयार करणे, नाशिकच्या उद्योजकांसाठी बीटूबी बैठकीचे नियोजन करणे, सरकारी योजना आणि प्रोत्साहने यासंबंधी माहिती देणे, आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांसह निर्यात प्रशिक्षण आयोजित करणे आदींसाठी प्रयत्नशील राहणार आहेत.

उद्योग विकास पॅनलचा अजेंडा

आयमाच्या माध्यमातून नवीन स्टार्टअपसाठी इनक्यूबेटर म्हणून काम करेल. नाशिक इंडस्ट्रीजसाठी वेब पोर्टल आणि पची जागतिक उपस्थिती, बीटूबी मीटिंग वापरणार्‍या आजारी उद्योगांसाठी सहाय्य आणि पॉप अप इव्हेंट्स, भूमिगत गटारासाठी मनपा आणि एमआयडीसीसोबत काम करणे, सी एस आर आणि एनजीओचा वापर करून सार्वजनिक शौचालये, एमआयडीसी भूखंडांसाठी क्षेत्रनिहाय स्वाक्षरी, शिक्षण संस्था आणि उद्योगांचा वापर करून कौशल्य कार्य शक्ती विकास, नाशिकमध्ये गुंतवणूक करण्यासाठी मोठ्या कॉर्पोरेट्स आणि उद्योगांना आमंत्रित करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहेत

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com