आयमा निवडणूक : आज अर्ज माघारीची अंतिम मुदत

आयमा निवडणूक : आज अर्ज माघारीची अंतिम मुदत

सातपूर । प्रतिनिधी Satpur

आयमा निवडणुकीत AIMA Election उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवसाची वाट न पाहता बुधवारी पुन्हा एका उमेदवाराने माघार घेतल्याने आतापर्यंत एकूण पाच उमेदवारांनी माघार घेतल्याने उद्योग विकास पॅनलला धक्का बसला आहे. आतापर्यंत 5 जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रिया पूर्ण झाली असून 30 जागांसाठी आता 68 उमेदवार रिंगणात आहेत.आज माघारीनंतर withdrawal of application forms चित्र स्पष्ट होईल.

आयमा निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली असून, रविवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस, खजिनदार प्रत्येकी एक जागा, सेक्रेटरी 2 जागा आणि कार्यकारिणी सदस्य 24 जागा अशा 30 जागांसाठी 73 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.

निवडणुकीत सत्ताधार्‍यांचे एकता पॅनल आणि विरोधकांचे उद्योग विकास पॅनल अशा दोन पॅनलमध्ये सरळसरळ लढत होणार आहे.

शुक्रवारी (दि. 21) उमेदवारी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस असताना तत्पूर्वी सोमवारी उद्योग विकास पॅनलचे अशोक ब्राह्मणकर, श्रीलाल पांडे, तानाजी पाटील आणि संजय वर्मा यांनी तडकाफडकी उमेदवारी अर्ज मागे घेऊन पॅनलला धक्का दिला होता. पाठोपाठ मंगळवारी याच पॅनलचे संजय सोसे यांनी माघार घेतली. त्यामुळे पॅनलच्या नियोजन समितीत प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे

उमेदवारी अर्ज छाननीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. छाननीत एकही अर्ज बाद झालेला नाही. त्यामुळे 30 जागांसाठी 73 अर्ज होते दरम्यान 5 जणांच्या माघारी मुळे 68 अर्ज उरले आहेत. शुक्रवारी (दि.21) माघारीची अंतिम मुदत असल्याने अतिरिक्त भरलेल्या अर्जासोबत नवीन चमत्कार पहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. या निवडणूक प्रक्रियेवर निर्णय अधिकारी म्हणून डी.जी.जोशी, विवेक गोगटे, आणि सी.डी. कुलकर्णी हे काम पाहत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com