आयमा निवडणूक; उद्योजकांमध्ये उत्सुकता

आयमा निवडणूक; उद्योजकांमध्ये उत्सुकता

सातपूर । प्रतिनिधी Satpur

उद्योजकांची महत्त्वाची संघटना association of entrepreneurs समजल्या जाणार्‍या आयमा द्वैवार्षिक निवडणूकीची AIMA - Elections प्रक्रिया गतिमान झाली असून, यंदाच्या निवडणुकीत एकता पॅनलने आपली उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. त्यात अध्यक्षपदासाठी निखील पांचाळ तर सरचिटणिस पदासाठी ललित बूब यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यासोबतच विरोधी गटाच्या बैठकांनीही गती घेतली असून, संजय महाजन याच्ंया नेतृत्वाखाली पॅनलची बांधणी करण्याची तयारी केली जात असल्याचे वृत्त आहे.

आयमाच्या 2018च्या लढतीत विरोधी पक्षाने सपशेल माघार घेत केवळ अध्यक्षपदाच्या एकमेव जागेसाठी लढत दिली होती. त्यात वरुण तलवार व तुषार चव्हाण यांच्यात सरळ सामना रंगला होता. या निवडणुकीत चव्हाण यांना निसटता पराभव सहन करावा लागला होता.

त्यानंतर दोन वर्षांच्या कार्यकाळात विद्यमान पदाधिकार्‍यांनी सुमारे पाचशे नवीन सदस्य केले होते. त्या 500 नवमतदारांच्या माध्यमातून निकालाची दिशा बदलणार असल्याची चर्चा उद्योजकांत होत आहे.

उद्योगांचे प्रश्न सोडवण्यासाठी पद्मश्री बाबूसेठ राठी यांनी स्थापन केलेल्या निमाच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात राजकारण झालेले आपण पाहीलेले आहे. ते राजकारण आयमात येऊ नये अशी भावनाही सामान्य उद्योजकांकडून व्यक्त होत आहे.

कोविडच्या महाभयंकर काळात निमाच्या प्रशासकिय कार्यकाळातील निष्क्रीयतेनंतर उद्योजकांची आशा ही आयमा वर स्थिरावली होती. अंबड, सातपूर, गोंदे, सिन्नर येथील उद्योजक आयमाचे सभासद झाले असून त्यांया माध्यमातून या निवडणूकीत कोणाच्या पदरात कौल टाकला जातो, हे पाहणे औस्त्युक्याचे ठरेल.

सत्ताधारी गटाकडून बहुतांश सर्वच माजी अध्यक्ष व पदाधिकार्‍यांच्या माध्यमातून विद्यमान उपाध्यक्ष निखिल पांचाळ यांना अध्यक्षपदाची उमेदवारी निश्चित झालेली असून, संपूर्ण एकता पॅनल च्या पदाधिकारी व सभासदांनी या उमेदवारीला दुजोरा दिलेला अस्याचे समजते. पॅनलच्या एकसंघातून सहजपणे विजयश्री पारड्यात पडावी याकरिता पॅनलच्या नेत्यांनी प्रचार यंत्रणांची आखणी सुरू केली असल्याचे समजते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com